चांदणी चौकातील घटना : दैव बलवत्तर : तिसऱ्या मजल्यावरून पडून अडीच वर्षाचा ” चिमुरडा” सुखरूप
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज :मो.९१५८४१७१३१ :- ओझर : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी एक घटना ओझर गावात घडली आहे. अवघ्या अडीच वर्षांचा चिमुरडा नागरी वसाहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो सुखरुप बचवला. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
येथील चांदनी चौकातील अलसना अपार्टमेंट येथे ही घटना घडली. फैजान सद्दाम शेख हा अडीच वर्षांचा मुलगा नागरी वसाहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली रस्त्यावर पडला होता.खेळता खेळता फैजान बाल्कनीच्या ग्रीलमधून खाली डोकवला व तोल गेल्याने फैजान तिसऱ्या मजल्यावरुन थेट रस्त्यावरती पडला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने धाव घेत त्याला उचलले व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत फैजानला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. एवढ्या उंचीवरुन पडून देखील फैजानला दुखापत झाली नसल्याने डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.
प्रतिक्रिया :- फैजान ने आईस्क्रीम चा हट्ट धरला होता आणि आईस्क्रीम मागता मागताच त्याचा तोल जाऊन तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, आमच्यावर देवाचीच कृपा झाली असे म्हणावे लागेल कारण तिसऱ्या मजल्यावरून पडून देखील इतका लहान असूनही त्यास दुखापत झाली नाही .त्याला थोडे कमरेत दुखत आहे बाकी कुठेही इजा झाली नाही. डॉक्टरांचा सुद्धा यावर विश्वास बसत नव्हता. आजीबानो शेख ,फैजान ची आई.
