पूजेच्या पैशावरून दोघा ब्राह्मणात तुफान राडा ,त्यांची शांती कोणी करावी ? चर्चा..!त्र्यंबकेश्वर येथील घटना

0
78

भारत पवार : मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१.                                          नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सद्य परिस्थिती अशी झालीय की करून टाकलीय हेच समजेनासे झाले परंतु परिस्थितीत बदल झालाय हे नक्की की. माणसा माणसातील माणुसकी किंवा प्रेम कमी झाले किंवा जवळ जवळ नाहीसेच झाले आहे असे म्हंटले तरी हरकत नाही.कारण आपण पहातोय नेहमी भावा भावा मधील भांडण मग ते वाटे हिश्श्याचे असो की अन्य काही कारण असो पण भांडण हे ठरलेलेच असते.काही ठिकाणी शेतीचा बांध नांगरला म्हणून भांडण झाली चक्क मारामारी हा वाद विवाद शेतकऱ्यांत होतोच .परंतु आपणास शांती मिळावी ,सुख शांती राहावी म्हणून आपण पर्याय शोधतो तो ब्राम्हणांचा .त्यांचे कडे जातो आणि ब्राम्हण सांगेल त्या रकमेत त्या पैशात त्यांनी सांगितलेला कार्यक्रम करत असतो.मग वास्तू शांती असू देत किंवा लग्न समारंभ असुदेत किंवा माणसाची शांती असू देत वगैरे वगैरे तुमची श्रध्दा आहे म्हणून सांगतो की जर ब्राम्हणाने प्रेमाने पूजा विधी केली तर त्याने पूजा विधी फी किंवा पैसे स्वतःहून ठरवले नसते तुम्ही द्याल तेवढ्यात करतो असे जर त्याने सांगितले असते तर आज त्यांच्यात भांडण करण्याची ” घटिका ” जवळ राहिली नसती आणि त्यांच्या हस्ते सगळं विधी हिंदू धर्मिय जनतेने केला म्हणून अखंड सुख शांती मिळायला पाहिजे होती.मग का घरात भांडण होतात ? का आजारी पडता ? हे सगळ मग अंधश्रद्धा नव्हे काय ? तीच पोथी ,तशीच पूजा आपण स्वतः केली तर ? तर काय लगेच घरात कलह माजेल का ? हे सगळ त्यांची पोट भरण्याची ही चलाखी म्हणावी लागेल. आज आपण चंद्रावर पोहचलो ,आज आपण डिजिटल दुनियेत वावरत आहोत असे असताना हिंदू धर्मिय जनतेत ब्राह्मणांशिवाय ” पान ” हलत नाही..कुठलाही पूजा विधी असुदेत ” ब्राम्हण ” पाहिजेच आणि म्हणूनच पूजेच्या पैशांवरून ब्राह्मण ब्राह्मनात तुफान राडा माजतो .कुठे गेली ही शांती ? शांती ची गरज हिंदू धर्मियांना आहे मग शांती ची गरज ब्राम्हणांना नाही का ? असा सवाल येथे चर्चिला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पूजेच्या पैशांवरून चक्क दोघा ब्राह्मणात तुफान राडा झाला इतका की भयानक वाईट शिव्या देत शिव्यांचे रूपांतर चक्क मारामारीत झाले आणि ऐका ब्राम्हणाने दुसऱ्या बे ब्राम्हणास चले जाव ची घोषणाच केली की इथून निघून जा … असे ते बोलत होते यावेळी नागरिकांचा जमाव वरील ब्राम्हणांच्या भांडणाचा आस्वाद घेत आश्चर्य व्यक्त करत होते.आणि म्हणत होते की , यानाच शांतीची खरी गरज असून यांची शांती कोण करेल ? अशी चर्चा सर्वत्र रंगत होती. पैशांवरून यांची शांती भंग पावली अर्थात यांची शांती विकोपाला गेली तर मग हे जनतेची शांती कशी चांगली करणार ? हा प्रश्नच असून समाजाने आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागृत होणे गरजेचे आहे.अगदी सोप आहे आपण लाखो रुपये खर्च करून हर बांधतो आणि घरभरणी ,पूजा विधी साठी ब्राम्हण बोलावतो मग त्या घरात कधीच शांती भंग व्हायला नको.तरी पण का भांडण होतात हा विचार कधी केला का आपण ? आणि नव्या घराची वास्तू शांती किंवा घर भरणी कार्यक्रम किंवा पूजा विधी साठी जर आपल्याच जन्मदात्या आईला आणि वडिलांना सांगून त्यांचे हस्ते जर हरभरणी ,पूजा विधी करून गरीबांना भोजन दिले तर आपणास अधिक शांती मिळणार हे तितकेच खरे आहे.विचार करा आणि हो समजा मुलगा आपला आहे आपणच (पती,पत्नी) त्याला जन्माला घातले आणि मग नाव ठेवायचा अधिकार आपला की मग ब्राह्मणाचा ? हा पण बोध घेतला पाहिजे .हे जर असून शोध आणि बोध घेतला तर पैशांवर ब्राह्मण ब्राह्मणात भांडण होणार नाही आणि असून स्वतः आई वडील यांना मानाचे परमोच्च स्थान देऊन त्यांचे हस्ते पूजा विधी केला त्याचे समाधान आपणास खूप काही सांगून जाईल.इथे सांगायचा उद्देश एवढाच की माणसा माणसात प्रेम राहिले नाही हे प्रेम फक्त पैशात आहे आणि म्हणून ब्राह्मण ब्राह्मणात तुफान राडा व्हायला लागला तो ही पैशांसाठीच.         __ शब्दांकन : भारत पवार,मुख्य संपादक ,             वार्ता संकलन _  दादाजी तानाजी शेवाळे ,नाशिक, गंगाधर दोधा शेवाळे ,माळवाडी, देवळा नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here