भारत पवार : मुख्य संपादक :मो.९१५८४१७१३१
ठेंगोडा : क स मा दे टाइम्स महारष्ट्र न्यूज नेटवर्क : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील प्रसिध्द गणेश मंदिराच्या प्रांगणत नाशिक जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकारी वसंतराव मोरे ,आयुक्त दीपक पाण्डेय व सटाणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष अमुलवार यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.ह्या सत्कार सोहळ्याचे विशेष नेतृत्व आणि मार्गदर्शन ठेंगोडा येथील प्रतिष्ठित नागरिक व समाज भूषण ,सामाजिक नेते अण्णासाहेब केरू पगारे तसेच सरपंच नारायण निकम यांचे लाभले. यावेळी ठेंगोडा गावातील वरिष्ठ पोलीस अधिकारी वसंतराव मोरे , आयुक्त दीपक पाण्डेय व सटाणा येथील पोलीस निरीक्षक सुभाष अमुलवार यांचा सत्कार सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ समाज भूषण ,सामाजिक नेते अण्णासाहेब केरू पगारे आणि सरपंच नारायण निकम यांच्या हस्ते देऊन करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच तुळशीदास शिंदे यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष परिश्रम ठेंगोडा येथील तरुण कार्यकर्ते ,समस्त ग्रामपंचायत सदस्य आणि गणेश पगारे यांनी केले .
