ताहाराबाद ग्रामपंचायत प्रशासनाचा लाखो रुपयांना गंडा , वातावरण टाईट उपोषण कर्त्यावर झाली राईट..

0
65

( उपोषण करणारे : शिवसेना बागलाण तालुका अध्यक्ष )   * जाहिराती आणि बातम्या साठी तसेच पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत संपर्क करा : भारत पवार ,मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१

ताहाराबाद : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीत गेल्या ४/५ महिन्यांपासून लखोरुपयांच्या भ्रष्टाचाराने वातावरण धगधगते असून ग्रामपंचायत कारभाऱ्यांचे अर्थात प्रशासनाचे धाबे दणाणले असून वातावरण टाईट झाले आहे म्हणून उपोषण करणारे सुभाष नंदन हे शिवसेनेचे बागलाण तालुका अध्यक्ष असूनही विरोधकांनी त्यांचेवर राईट केल्याने वातावरण अधिक गरम झाले आहे.सद्या येथे ढगाळ वातावरण असल्याने उन्हाळ्यातील  नैसर्गिक वातावरण काहीसे थंड असेल तरी ताहाराबाद गावातील ग्रामपंचायतीच्या वातावरणामुळे गावातील वातावरण तापलेले आहे.त्यामुळे थंड वातावरणात सुद्धा ग्रामपंचायत प्रशानास ” गरम झळा ” लागतात असे दिसते.लाखोंचा गंडा उघड होऊन सुद्धा हुशार प्रशासन भ्रष्टाचार करणाऱ्यांना का अभय देत आहे ? असा सवाल ग्रामस्थात चर्चिला जात आहे.

याबाबत समजलेली हकीकत अशी की,बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीत सात विकास कामांचे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करून लाखो रुपयांचा भ्ष्टाचार झाल्याचे पुरावे समोर उघडकिस होऊनही दोषींवर कारवाई करण्यास प्रशासन पुढे येत नसल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात यावी दोषी ठरलेल्या अधिकारी,सरपंच आणि सत्ताधारी सदस्यांवर फौजदारी खटला दाखल करावा या मागणीसाठी शिवसेनेचे बागलाण तालुका अध्यक्ष सुभाष नंदन यांनी आमरण उपोषणाचे हत्यार २२ मार्च ०२२ पासून उपसले आहे. सटाणा येथील पंचायती समोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून परवा रात्री १२.०० वा.सुमारास विरोधकांनी नंदन व त्यांच्या सहकऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला सहकारी जखमी झाले असून नंदन मात्र बालंबाल बचावले आहेत.हा हल्ला सटाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कोल्हे, विस्तार अधिकारी सूर्यवंशी आणि सावंत यांच्या समोर घडल्याचे बोलले जात असून चर्चेला वेगळेच उधाण आले आहे.हल्ला करणाऱ्यांमध्ये सरपंच शीतल नंदन यांचे पती योगेश नंदन, भाऊसाहेब नांद्रे, प्रशांत सोनवणे, व अन्य जणांचा समावेश असल्याचे उपोषण कर्ते सुभाष नंदन यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले. चौकशी अहवाल नुसार दोषींवर कारवाई करण्यात येऊन फौजदारी खटला भरण्यात येत नाही तो पर्यंत मी मागे हटणार नाही माझे आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विशेष म्हणजे ताहाराबाद ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भ्ष्टाचाराविरुद्धच्या बातम्या सर्वत्र झळकत आहेत आणि टीव्ही वरती सुद्धा बातम्या दाखवले गेले आहेत तरीही आमचे काही झाले नाही असा निर्लज्ज टोला ग्रामविकास अधिकारी पवार यांनी खुद्द महाराष्ट्र न्यूज शी बोलताना ठेंगोडा येथील ग्रामपंचायतीत एका भेटी प्रसंगी लगावला होता. भ्रष्टाचाराबाबत हा अधिकारी किती निगरगट्ट आणि पोसलेला आहे याची कल्पना त्याचे बोलण्यावरून येतेच अशा अधिकार्यांची नांगी प्रशासनाने वेळीच ठेचने गरजेचे असून त्यास पुन्हा ठेंगोडा ग्रामपंचायतीत कारभार पाहण्याची जबाबदारी दिल्याने त्या ग्रामपंचायतीत सुध्दा ” मलई ” मिळणार की नाही ? की मी नाही त्यातली …. असे म्हणून जनतेवर रुबाबाचे आसूड ठेवणार असे पवार यांच्या बोलण्यावरून दिसले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here