देवळा: हॉटेल ठेका वरती रात्री दारू विक्रीचा खेळ चाले , पोलिसांना कळाले, शाम गावंडे यास यास ताब्यात घेतले …!

0
55

भारत पवार , मुख्य संपादक ,मो.९१५८४१७१३१

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील नाशिक हायवेला असलेल्या हॉटेल ठेका येथे रोज रात्री अवैध देशी – विदेशी दारू विक्रीचा खेळ चाले हे कळवण विभागाच्या ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांना कळाले एकास मात्र ताब्यात घेतले.

देवळा येथील नाशिक हायवेला रामेश्वर फाट्याच्या पुढे असणाऱ्या हॉटेल ” ठेका ” येथे दररोज रात्री अगदी ” ठेक्यात” मद्य विक्री चालते अशी माहिती नाशिक ग्रामीण कळवण विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांना मिळताच त्यांच्या पथकाने ” झ्टक्यात” ठेक्यात दाखल होऊन ” ठेका ” हॉटेल मधून ६ हजार ६९० रू. चा देशी विदेशी मद्य साठा जप्त करून शाम अशोक गावंडे (२४) , रा.ठेका हॉटेल,ता.देवळा( नाशिक) यास ताब्यात घेतले.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील व कळवण विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदरशनाखाली जिल्ह्यातील अवैध मद्य, गुटका आणि अन्य अंमली पदार्थ यांची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यास साठी भरारी पथक नेमण्यात आले असून हे पथक जिल्हा भर कार्यरत असून पथकाने देवळा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या हॉटेल ठेका येथे कारवाई केली.अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार देवळा नाशिक हायवे लगत असलेल्या ठेका हॉटेल मधून बेकायदेशीर अवैध आणि चोरट्या पद्धतीने देशी,विदेशी दारू ची साठवणूक करून विक्री करताना इसम शाम अशोक गावंडे हा सापडला त्याचे ताब्यातून ६६९० रू.किमतीचा अवैध दारूसाठा मिळून आला.त्यानुसार देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक भाऊसाहेब टिळे, रावसाहेब कांबळे,कुणाल वैष्णव यांनी कामगिरी बजावली.असून अवैध आणि बेकायदेशीर धंदे करणारे देवळा आणि देवळा तालुक्यात हॉटेल चालकांचे धाबे दणाणले असून तोंडे चे पाणी पळाले आहे.त्यामुळे उन्हाळ्यात ह्या हॉटेल चालकांच्या ” घशास” कोरड पडणार की ओलावा टिकणार अशी अवस्था हॉटेल चालकांची झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here