आज ह्या जिल्ह्यांना अवकाळी पाऊसाची शक्यता
1 min read


भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि आपल्या परिसरातील बातम्या काही सेकंदात महाराष्ट्रातील प्रत्येक वाचकांच्या घराघरात आणि मनामनात , जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क : मो . ९१५८४१७१३१

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : आज दि.१९ रोजी मुंबई कुलाबा , सांताक्रूझ,नाशिक,कोल्हापूर,पुणे,परभणी,या जिल्ह्यात सकाळ पासून हवामान ढगाळ असून हवामानात बदल झाला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार २१ मार्च दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली असल्याने शेतकऱ्यानी सावधानी बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे.द्राक्ष , कांदे,आंबा पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले गेले. वरील जिल्ह्यात ढगाळ वातावरण सकाळ पासून असल्याने काही तासात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊसाचा फटका बसणार असल्याची शक्यता आहे.





