केंद्र सरकारची मोठी घोषणा : आता विनारेशन कार्ड मिळणार रेशन … वाचा सविस्तर…

0
24

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिरात आणि बातम्या काही सेकंदात संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात : संपर्क : मो.९१५८४१७१३१.     

नवी दिल्ली : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : _ केंद्र सरकारने गोरगरीब आणि मध्यम वर्गीय नागरिकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली असून यासाठी ९६.८ टक्के नागरिकांना फायदा होणार आहे. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार रेशन कार्ड धारकांना आपले हककाचे रेशन घेण्या करिता नवीन घोषणे नुसार आता रेशन कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही याबाबत माहिती देताना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल माहिती दिली की आता रेशन कार्ड धारकांना रेशन घेण्या करिता दुकांदारास रेशन कार्ड दाखविण्याची गरज नाही.आता पर्यंत रेशन दुकानातून धान्य घेताना सरकारी रेशन दुकानदारास रेशन कार्ड द्यावं लागतं होत.परंतु आता मात्र रेशन कार्ड धारकांस जिथे राहतात तिथे जवळच्या रेशन धान्य दुकानात रेशकार्ड नंबर आणि आधार नंबर सांगून सहज पने रेशन मिळू शकते.

मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की रेशकार्ड प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे देशात वन नेशन ,वन रेशन कार्ड ची सुविधा लागू करण्यात येत आहे.सरकारी आकडेवारी नुसार आता पर्यंत देशात वन नेशन ,वन रेशन कार्ड द्वारे ७७ कोटी लोकांना जोडण्यात आले आहे.यात रेशन कार्ड वापरणाऱ्यांची संख्या ९६.८ टक्के आहे.यात ३५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील लोकांना सामील करून घेतले आहे.

एखाद्या नागरीकाचे रेशकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि नोकरी निमित्ताने ती व्यक्ती दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल तर त्याला त्याचा रेशकार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर देऊन कोणत्याही दुकानावर रेशन किंवा धान्य मिळू शकते.यासाठी रेशनकार्ड दाखविण्याची गरज नसल्याचे मंत्री गोयल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here