१२ते १४वयोगटातील मुलांसाठी CORBIVAX लसीकरण कॅम्प चे उद्घाटन संपन्न
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती व बातम्या साठी संपर्कात रहा : मो.९१५८४१७१३१. ब्राह्मणगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रात 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण देण्याच्या मोहिमेअंतर्गत “CORBIVAX” या लसीकरण कॅम्पस चे उद्घाटन ब्राह्मणगाव ग्रामपालिकेचे सरपंच श्री. किरण अहिरे व उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. बापुराज खरे व ग्रामपालिका चे जेष्ठ सदस्य श्री. रत्नाकर अहिरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल कांबळे, डॉ.अभिजित गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी ब्राह्मणगाव येथील माध्यमिक हायस्कूल च्या 12 ते 14 वयोगटातील मुलांना या ” CORBIVAX” लसीचे लसीकरण मोठया उत्स्फुर्तपणे करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी सरपंच श्री. किरण अहिरे,उपसरपंच श्री.बापुराज खरे,ग्रामपालिका जेष्ठ सदस्य श्री.रत्नाकर अहिरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल कांबळे, डॉ.अभिजित गायकवाड, आरोग्य सेवक श्री.सुभाष देवरे नाना,श्री. समाधान मोरे,आरोग्य सेविका श्रीमती वाघ सिस्टर, श्रीमती मनाली हिरे,सामाजिक कार्यकर्ते श्री.गुलाब खरे,प्रमोद खरे,आशा गट प्रवर्तक श्रीमती गीतांजली काळे,आशा कर्मचारी-श्रीमती सुनीता जाधव,श्रीमती स्मिता धुमाळ, श्रीमती वैशाली म्हसदे,डेटा ऑपरेटर कुणाल बच्छाव तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
