मालेगाव : नादच खुळा…थकबाकीदार मालमत्तेवर लावा ताळा ,कर भरा कारवाई टाळा _ आयुक्त गोसावी

0
43

जाहिराती आणि तुमच्या परिसरातील ताज्या घडामोडी साठी संपर्क करा.तसेच ” महाराष्ट्र न्यूज ” साठी संपूर्ण राज्यात “पत्रकार ” नियुक्त करण्यात येत आहेत.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज :, मो.९१५८४१७१३१.         मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ मार्च महिना उजाडला की सर्व शासकीय कार्यालयात एकच घाई असते ती मार्च महिना अखेर पर्यंत कर वसुली चे टार्गेट पूर्ण करण्याचे. एक ” नादच खुळा “कर भरा आणि ” कारवाई टाळा ” असेच यानिमित्ताने म्हणावे लागेल.या नादच खुळा प्रमाणे मालेगाव महानगर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत अगदी परवा पर्यंत कर न भरलेल्या नऊ मालमत्ता जप्त करण्यात आल्याने थकबाकीदरांचे धाबे दणाणले आहे.मालेगाव महानगरात मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असल्याचे बोलले जात आहे .मार्च अखेर पर्यंत कर वसुली चे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश मालेगाव महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी काढले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी मालमत्ता थकबाकी वसुली बाबत आयुक्त गोसावी यांनी आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी थकबाकी वसुली बाबत मन घट्ट करून आपले पाऊले कठोर करावीत आणि व्यापक स्वरूपात मोहीम यशस्वी करावी तसेच प्रभाग अधिकाऱ्यांनी थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.त्याप्रमाणे प्रभाग निहाय चार वसुली पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त गोसावी यांनी दिली. पथकात अधिकारी व कर्मचारी अशा ४६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.प्रभाग १ मधील भायगाव _१ या वॉर्डातील घरपट्टी थकबाकी अधिक दंडासह वसुली करण्या साठी आयुक्त गोसावी,उपायुक्त राजू खैरनार, सहा.आयुक्त (कर) हेमलता ढगळे यांचे मार्गर्शनाखाली प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर,जयपाल त्रिभुवन,वार्ड लिपिक पुंडलिक ढोणे,संजय ठाकूर,अमित पगारे,सचिन रावेरकर आदींनी थकबाकीदार जिग्नेश हिरालाल पटेल थकित रक्कम २ लाख ३हजार ३३१,कमलेश संभाजी बिरारी १लाख ३७ हजार ६९, राजेंद्र शांताराम बागड १लाख२३हजार२०७ , भिका श्रीधर वाणी ९५ हजार ७५८ , जितेंद्र रमेश राजमाया ३९ हजार ९२२ , मेवाती जटाशंकर तिवारी३९ हजार ९२२ , प्रेमसागर जटाशंकर तिवारी ३९ हजार ९२२ , सरिता विजय पवार ९५ हजार ७५२ , प्रमोद दत्तात्रय सोनजे ८५ हजार ३४ आदींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. नागरिकांनी तात्काळ कर भरून मालेगाव महापालिकेस सहकार्य करावे आणि कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.         ” नादच खुळा , कारवाई टाळा “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here