कलेक्टर साहेब हे बरं हाय काय ? पाटोद्यात चाललय काय ,तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रायव्हेट माणसे कामे करतात कसं काय ?
1 min read

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा , तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत .संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१
➡️ तालुका दंडाधिकारी म्हणून तहसिलदार यांच्याकडे न्याय मागण्यासाठी सामान्य नागरिक गेलेतर त्यांना हिन वागणूक
पाटोदा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : डॉ.हरिदास शेलार : तालुका दंडाधिकारी म्हणून पाटोदा तहसिलदार यांच्याकडे सामान्य नागरिक न्याय मागण्यासाठी गेले असता त्यांना नेयमाच्या नावाखाली पाटोदा तहसिलदार ह्या हीन वागणूक देतात यामुळे सामाजिक कार्यक्रते व पञकार विचारण्यासाठी पाटोदा तहसीलदार यांच्याकडे गेले असता तहसीलदारच्या केबिन मध्ये बाहरेचे लोक संगणकावर काम करताना दिसले यावेळी पञकाराने विचारणा केली असता तुम्ही आम्हाला पञकाराना उडवा उडवीचे उत्तर दिले असून हा प्रकार अतिशय गंभीर असून तहसील मध्ये बाहेरचे माणसे संगणाकावर कामे करतात कस काय ? शासकीय डाटा लिक झाला तर याला जबाबदार कोण? तहसिलदार हा तालुका दंडाधिकारी असल्यामुळे सामान्य नागरिक न्याय मागण्या साठी जातात तहसीलदारच सामान्य लोकांना हिन वागणूक देतात तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा यामुळे जिल्हा अधिकारी साहेब पाटोदा तहसिल मध्ये चाललय काय ? शासकीय कार्यालयात काम होत नसले तर तालुका दंडाधिकारी कार्यालयात योग्य वागणूक मिळत नसेल तर सामान्य नागरिकांने न्याय कोणाकडे मागायचा? तालुक्यातील सर्वात मोठ्या कार्यालयात आशी परस्थिती पाहिला मिळते तर इतर विभागात काय अवस्था पाहिला मिळत असेल यामुळे सर्व गंभीर विषयाची जिल्हाधिकारी साहेब यांनी चौकशी करावी तसेच जे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही तसेच तालुक्यातील विविध कार्यालयात वेळेवर व गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहात नाही यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाटोदा तालुक्यातुन होत तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गोरख झेंडे,भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष कादरभाई चाऊस,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,पञकार गणेश शेवाळे, डॉक्टर हरीदास शेलार यांनी केली आहे.
