शेतकरी हित : किसान रेल्वे आता आठवड्यातून चार दिवस सुरू करणार , केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश
1 min read

जाहिराती आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी साठी तात्काळ संपर्क करा ,तसेच संपूर्ण राज्यात ” पत्रकार ” नियुक्ती करण्यात येत आहेत…संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१. नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , नेटवर्क _ नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आणि लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या कडे केलेली मागणीची दखल घेत यापुढे किसान रेल्वे आठवड्यातून चार दिवस सुरू करणार असल्याचं निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.त्यामुळे कांदा उत्पादकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे त्यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रिय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे प्रयत्न सार्थकी लागल्याने शेतकरी वर्गात आनंद पसरला आहे. गेल्या. महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांच्या समवेत मंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्यात झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत मंत्री डॉ.पवार यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेची दखल घेत मध्य रेल्वेच्या नाशिकरोड रेल्वे स्थानकातून आठवड्यातून तीन दिवस सोडण्यात येणारी किसान रेल्वे आता चार दिवस सोडण्यात येणार आहे.त्यामुळे शेती मालास योग्य भाव मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली . आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथून सोमवार पासून किसान रेल्वे रवाना झाली. सध्या आढवड्यातून मंगळवार,गुरुवार,शनिवार असे तीन दिवस हि रेल्वे होती आठवड्यातून चार ते पाच दिवस किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली होती. डॉ.पवार यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून सोमवार पासून लासलगाव येथे किसान रेल्वेला थांबा देण्यात आला.सोमवारी सभापती सुवर्णा जगताप यांनी लासलगाव रेल्वेस्टेशन येथे व्हीपीचे पूजन करून किसान रेल्वेचे स्वागत केलेे.यावेळी स्मिता कुलकर्णी,राजाभाऊ चाफेकर,मुख्य पार्सल अधिकारी विजय जोशी,राम साळवे,सतीश सोळशे,कुणाल केदारे,सागर शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते. सध्या लासलगाव येथून ९६ टन कांदा रवाना करण्यात आला. किसान रेल्वे ला सध्या एकच व्हीपी पार्सल व्हेन आहे त्यामुळे कांदा,भुसार,तेलबिया,डाळींब,द्राक्ष,भाजीपाला आदी माल निर्यात करण्या साठी चार ते पाच पार्सल व्हेन ची आवश्यकता असल्याने ते वाढविण्यात यावे अशीही मागणी सभापती जगताप यांनी यावेळी केली आहे.
