
आपली जाहिरात अल्प दरात महाराष्ट्रातील घरा घरात आणि वाचकांच्या मना मनात .आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी तात्काळ संपर्क करा,तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ” पत्रकार ” नियुक्त करण्यात येत आहेत : संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज :मो.९१५८४१७१३१. पिंपरी : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात संताप व्यक्त केला जात असून सामाजिक वातावरण सुद्धा तापल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.राज्यपाल यांनी ” समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कुणी विचारले असते ” असे वादग्रस्त विधान केले त्यामुळे विविध राजकीय तथा सामाजिक संघटनांकडून आक्रमक भूमिका घेऊन निदर्शने केली जात आहेत.संभाजी ब्रिगेड ने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत राज्यपालांच्या प्रतीमेस जोडे मारून आंदोलन केले यावेळी मानव कांबळे म्हणाले राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या त्यामुळे त्यांना तातडीने हटवावे अशी मागणी केली.मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव,मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष एडवोकेट लक्ष्मण रानवडे , छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील ,जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा सुनीता शिंदे, अपना वतन चे राजश्री शिरवळकर, एम आय एम पक्षाच्या रुहिनाज शेख,बारा बलुतेदार महासंघाचे विशाल जाधव,तसेच शहाबुद्दीन शेख आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.आंदोलनास संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते,मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोहे ,शहर कार्याध्यक्ष संजय जाधव,उपाध्यक्ष नितीन जाधव,महेश कांबळे,संघटक विनोद घोडके,राजेंद्र चव्हाण,बाळासाहेब वाघमारे,जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष स्मिता म्हसकर,अपना वतन संघतेनेचे हमीद शेख,सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार, राम चिंताले ,महेश गवस,दत्ता भालेराव,जयेश दाभाडे,लक्ष्मण पांचाळ, गणेश बावणे,निरंजन महाराज शास्त्री, शाम पाटील,आदींनी सहभाग घेतला होता. आंदोलनाचे आयोजन संभाजी ब्रिगेड चे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले होते.
