आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती महाराष्ट्रातील प्रत्येक वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहचविणारे एकमेव निर्भिड सडेतोड ” महाराष्ट्र न्यूज ” साठी तात्काळ संपर्क करा.. तसेच संपूर्ण राज्यात ” पत्रकार “, नियुक्त करण्यात येत आहेत …संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१
तळा ( रायगड ) : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : संतोष जाधव _ रायगड जिल्ह्यातील तळा येथील
ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर महाशिवरात्री निमित्त दि.१ मार्च २०२२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्री जय हरि सेवा मंडळ यांच्या वतीने दरवर्षी तळगडावर महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतो.यानिमित्ताने शहरासह तालुक्यातील बहुतांश भाविक आवर्जून तळगडावर दर्शनासाठी येतात.हे वर्ष मंडळाचे १४ वे वर्ष असून यावर्षी देखील कोरोना चा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेत सामाजिक अंतर पाळत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.ज्यामध्ये सकाळी ८ वा. शिवपिंडीवर अभिषेक,सकाळी ९ वा. आरती व तीर्थप्रसाद दुपारी १ वा. ह.भ.प.भागोजी महाराज सरफळे यांचे कीर्तन,दुपारी ३ वा. जयहरी सेवा मंडळाचे भजन,व सायंकाळी ५ वा. नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार,६ वाजेपर्यंत महिलांसाठी हळदी कुंकू आशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील भाविकांनी सामाजिक अंतर व मास्क चा वापर करून तिर्थप्रासादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जयहरी सेवा मंडळ व महिला मंडळ,ओम साईराम सेवा मंडळ तसेच मी शिवभक्त सामाजिक संस्था यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
