देवळा : वार्षी येथे आरोग्य उपकेंद्र स्थापनेस मान्यता _ डॉ.नूतन आहेर
1 min read

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती आता काही सेकंदात संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मना मनात पोहचविणारे क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत तसेच आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक ,मो.९१५८४१७१३१ देवळा-(दि.२८ फेब्रुवारी) आदिवासी दुर्गम भागात वसलेल्याा नासिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वार्शी या गावासह परिसरातील इतर पाच खेड्यातील गरोदर माता, लहान मुले व इतर अचानक उद्भवणारी आरोग्य समस्या उभी ठाकल्यास येथील जनतेस मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते, वार्षी गावासह परिसरातील जनतेची अनेक दिवसांपासून आरोग्य उपकेंद्राची मागणी होती परंतु आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्यासाठी प्रयत्न केलेले नव्हते वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ सौ नूतनताई सुनील आहेर यांनी स्वतः जातीने लक्ष घालत संबंधितांकडून प्रस्ताव तयार करून घेतला व जिल्हा परिषदेत त्याचा सतत पाठपुरावा केला आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत वार्षी आरोग्य उपकेंद्रास मंजुरी मिळाली असल्याची माहिती डॉ.नूतन आहेर यांनी दिली, वार्शी गावासह परिसरातील गरोदर माता, नवजात बालक यांच्यासह इतरही सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे असे डॉ. आहेर म्हणाल्या, परिसरातील सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
