आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा : संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.९१५८४१७१३१ देवळा : क स. मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ जिल्हा परिषदेच्या आज ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सर्वसाधारण बैठकीत माळवाडी, फुले माळवाडी व सरस्वती वाडी या तीनही गावांना नऊ गाव पाणीपुरवठा योजनेतून वगळून त्यांचा जलजीवन मिशन या योजनेत समावेश करण्यात आला, सदर योजनेत समावेश झाल्याने गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार आहे, गावांतील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती केलेल्या पाठपुराव्यास यश आले व जल जीवन मिशन या योजनेत वरील गावांचा समावेश झाला असल्याची माहिती डॉ.नुतन आहेर यांनी दिली.
