माणगाव तालुक्यात आ. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते विविध कोट्यवधी रुपयांचे विकास कामांचे उद्घाटन

0
53

संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेल्या ” महाराष्ट्र न्यूज ” तुमच्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा.. तसेच महाराष्ट्रात सर्वत्र ” पत्रकार ” नियुक्ती करण्यात येत आहे.. संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक ,मो.९१५८४१७१३१ 

माणगाव / गोरेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : पांडुरंग माने _

माणगाव तालुक्या मधील गोरेगाव विभागातील मौजे वडगाव येथे ग्रामपंचायत इमारत उद्घाटन ,वडघर येथे अंगणवाडी इमारत उद्घाटन ,वडघर येथे व्यायाम शाळा इमारत उद्घाटन ,वडगाव सामाजिक सभागृह भूमिपूजन वडगाव स्मशानभूमी रस्ता भूमिपूजन ,वडघर बौद्धवाडी स्मशानभूमी रस्ता भूमिपूजन ,वडगाव पाणी पाईपलाईन दुरुस्ती ,वडघर हनुमान मंदिर रस्ता भूमिपूजन*
इत्यादी विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा दिनांक 27 फेब्रु रोजी विभागातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की तुम्ही जे जे विकास्कामे सांगाल ते आम्ही करत आहोत तुम्ही फक्त पाच वर्षातून एकदा आम्हाला एक मत द्यायचे आहे बाकी पाच वर्ष आम्ही तुमचे बांधील असणार आहोत आतापर्यंत या विभागात जी कामे झाली आहेत ती फक्त शिवसेना आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून झाली आहेत आम्ही खोटी आश्वासने देत नाही तर आश्वासन पूर्ती करतो असे गोगावले यांनी पुढे सांगितले
आमदार साहेब यांनी दिवंगत माजी सभापती राजेश जी पानवकर यांनी केलेल्या विकास कामाची प्रशंसा करुन आज ह्या विभागांतील एक सच्चा नेता निघून गेल्याने हळहळ व्यक्त केली तसेच उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली

या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर जिल्हा परिषद सदस्य अमृता हरवंडकर पंचायत समिती उपसभापती सुजित शिंदे ,तालुका प्रमुख गजानन अधिकारी विभाग प्रमुख जगदीश भोकरे उपविभाग प्रमुख मंगेश कदम विभाग प्रमुख मधुकर नाडकर, चंद्रकात यादव, नथुराम बामनोलकर गोरेगाव शहर प्रमुख प्रदिप गोरेगावकर, वडगाव सरपंच जनार्धन गावडे विद्यमान सरपंच शिवाजी गावडे ,उपसरपंच इंदू पानवकर आणि विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी व् शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here