आमरण उपोषणाला पाठींबा : संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रकृतीत कसुभर जरी फरक पडला तर…देवळा येथील मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
1 min read

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती काही सेकंदात महाराष्ट्रातील प्रत्येक वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहचविण्यासाठी क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज शी संपर्क करा . संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक ,मो.९१५८४१७१३१

संपूर्ण महाराष्ट्रात ” पत्रकार ” नियुक्त केले जात आहेत.इच्छुकांनी संपर्क साधावा.
देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेेेले खासदार संभाजी राजे छत्रपती यांना पाठिंबा म्हणून नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने देवळा येथील तहसीलदार सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक लांडगे यांना आज निवेदन देऊन देण्यात आला.यावेळी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी मराठा समाजातील सर्व पदाधिकारी यांच्या भेटीत निवेदन स्वीकारले. खा.संभाजी राजे यांनी दि.२६ फेब्रू.०२२ रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आणि उपोषण सुरूही झाले त्यास पाठींबा म्हणून देवळा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्णपणे जाहीर पाठिंबा देण्यात आला असून मराठा आरक्षण हा फक्त आरक्षणाचा प्रश्न नसून तो प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीचा प्रश्न बनला आहे.तसेच मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.आज संभाजी राजे छत्रपती प्राणांकित उपोषण करीत आहेत दरम्यानच्या काळात राजे यांच्या प्रकृतीत कसूभर जरी फरक पडला तर संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेकाचे पडसाद उमटतील असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून असा प्रश्न निर्माण झाल्यास यास आपले शासन व प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.