देवळा तालुक्यात शिवसेनेचा बोजवारा , वैतागून खांदेपालट !

0
29

महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक वाचकाच्या मनात पोहचविणारे ” महाराष्ट्र न्यूज ” करीता आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा : संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१.                                       देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत मरगळलेली अवस्था आली असल्याने तालुक्यातील शिवसेनेला सुध्दा मरगळ आल्याने त्यामुळे येथील शिवसेनेचा बोजवारा उडाला असून लवकरच खांदेपालट होणार अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ यांनी ” महाराष्ट्र न्यूज ” शी  यावेळी व्यक्त केली. देवळा येथील शासकीय विश्रामगृहात वाघ यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या कार्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.पुढे बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असून सुध्धा देवळा तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनगटात काम करण्याचा”जोश” नसल्याने कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा ” होश  “ उडाला आहे त्यामुळे तालुक्यात आपण वर्चस्व गमावून बसली की काय ? असा प्रश्न निर्माण झाला असून लवकरच तालुक्यात खांदेपालट होणार पक्ष देऊन त्या पदाधिकऱ्यां सोबत शिवसैनिकांनी काम करावे असे भावनिक आवाहन देवानंद वाघ यांनी यावेळी केले असून देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत एका पदाधिकाऱ्याने चक्क पक्षाशी गद्दारी करून ” फुल ” हाती घेतले. त्यामुळे सुद्धा पक्षात नाराजी पसरली आहे. सद्या अनेक” फुल “वासीय ” शिवबंधन ” हातात बांधत असून नाशिक शहरातील अनेक भाजप नेते शिवसेनेत दाखल होत असलयाचे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीस बापू जाधव ,मुन्ना आढाव,नंदू जाधव, एस.के.शिंदे,भास्कर अहिरे, भास्कर पवार,विश्वनाथ गुंजाळ,बंडू चव्हाण,आबा बोरसे, नाजीस तांबोळी,खंडू जाधव,ज्योती थोरात,सतीश आहेर,देवा चव्हाण,समाधान शिंदे,दीपक देवरे,वसंत सूर्यवंशी,प्रशांत शेवाळे, भरत देवरे,संजय ठाकरे,विलास शिंदे,भाऊसाहेब चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here