मालेगाव : शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष पदी रामभाऊ मिस्त्री

0
61

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा .तसेच राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत .संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो. ९१५८४१७१३१.                                               मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ मालेगाव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नुकतीच शिवसेना भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना बढती देण्यात आल्याने शिवसेना गोटात आनंद पसरला असून मित्र परीवारा मध्ये सुध्दा आनंदाचा जोश संचारला आहे.येथील शिवसेनेचे निष्ठावंत जुने पदाधिकारी रामभाऊ मिस्त्री यांची शिवसेना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याने मालेगाव महानगरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तर राज्याचे कृषी मंत्री  ना.दादा साहेब भुसे , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज चे संपादक भारत पवार , एड.संजय दुसाने आदी सह अनेक चाहत्यांनी मिस्त्री यांचे अभिनंदन केले आहे.                     रामा भाऊ मिस्त्री हे गेली ३० ते ३५ वर्षां पासून शिवसेना पक्षात सक्रीय असून त्यांनी मालेगाव येथे शिवसेना पक्ष वाढविण्यात खूपच खडतर मेहनत घेतली.त्यांनी तळागाळात शिवसेना पोहचवली असून पदाधिकारी असून सुध्दा कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी शिवसेनेत काम केले आहे.त्यांच्या कामाची लकब खूपच वेगळी असून मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मध्ये अनेक कार्यकर्त्यांत मिस्त्री यांनी नावलौकिक मिळविला आहे.महाराष्ट्राचे कृषी मंत्री ना.दादासाहेब भुसे यांचे ते विश्वासू सहकारी असून मिस्त्री यांना कामाची पावती म्हणून जिल्हा उपाध्यक्ष पदी बढती दिल्याने जिल्हा भरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.आपला माणूस , हक्काचा माणूस जिल्हा उपाध्यक्ष झाला अशी चर्चा मालेगाव महानगरात रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here