महाराष्ट्रात “घडलय _ बिघडलंय ” : लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार ?

0
54

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले “महाराष्ट्र न्यूज “वेब चॅनल साठी राज्यभरात “पत्रकार” नियुक्त केले जात आहेत तसेच आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती साठी आजच संपर्क करा … संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज          वाचक संख्या : ५९६०० +                                        संपर्क मो.९१५८४१७१३१.                                       मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रातील राजकारण्यांनी जनहिताच्या दृष्टीने मागचा पुढचा विचार न करता भ्रष्ट्राचाराचा ” कळस ” गाठण्यास अव्वल क्रमांक पटकावला असल्याने न्यायालय भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचे कोठीत घालून स्वागत करत आहे .भ्रष्टाचाराचा वीट आणणारे महाराष्ट्राचे राजकरण खूपच ” गचाळ ” झाले आहे त्यामुळे राजकारणातील वातावरण खूपच ” दुषीत ” झाले आहे.अशावेळी महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याची शक्यता आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली. आमदार राणा दिल्लीहून परतले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल असे संकेत त्यांनी बोलून दाखवले.पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्री पद गमवाव लागले तर राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे” ईडी ” च्या  कोठडीत आहेत ,राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्य मंत्री बचू कडू यांना लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ अंतर्गत चांदुर बाजार येथील प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय क्रमांक १ यांनी दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि रुपये २५ हजार इतका दंड ठोठावला आहे.या सर्व ” घडलय बिघडलंय ” घटना पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र मध्ये लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होणार असे सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here