June 26, 2022

पुळचट नेतृत्व समाजाला घातक

1 min read

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले महाराष्ट्र न्यूज साठी संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत तसेच आपल्या परिसरातील ताज्या बातम्या , जाहिराती साठी संपर्क करा. संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१                                                    उल्हासनगर / मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : 
समाजाच्या हितासाठी भल्यासाठी विकासासाठी उत्कर्षांसाठी अपार कष्ट त्याग अन मेहनत करून समाजाचं भलं नेमकं कश्यात आहे? याचा शोध घेऊन समाजाला योग्य दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच नेतृत्व करणं होय नेतृत्व हे नेहमी बलदंड कणखर निर्भीड अन निरपेक्ष डोळस असलं पाहिजे तरच आपण एखाद्या घटकाचे अथवा समूहाचे नेतृत्व करू शकतो ज्याला समर्थन अन
परकोटी चा विरोध झूगारूण पुढे जाण्याची धमक अन उर्मी असते तोच नेतृत्व करू शकतो नेतृत्व म्हणजे काटेरी मुकुट नेतृत्व म्हणजे लोखंडी चणे नेतृत्व म्हणजे बदनामी चे आगर नेतृत्व बाजारात विकत अथवा उसणं कधीच मिळतं नसते त्याला धाडस अन छातीवर वार झेलण्याची तयारी अन मानसिकता लागते समाजातील समूहाची व्यथा वेदना ज्याला समजतात त्यालाच नेतृत्व करता येते नेतृत्व येड्यागबाळ्याचे काम नाही नेतृत्व म्हणजे तळपती तलवार असते ज्याचा एकाच वाराने भलेभले गार होतात हल्ली असं नेतृत्व दिसत नाही समाजाचे भले करणे तर सोडाच उलट समाजाच्या नावावर तुंबड्या भरून स्वतःचं भलं करून गाडी बंगला भोगविलासी राहणीमान अंगीकारून स्वहित जपून समाजाला उपेक्षित ठेऊन स्वताचे घर भरून श्रीमंत होणे व समाजाला पुन्हा वंचित ठेवणे असं नेतृत्व समाजाला घातक असते.
अर्थात पुळचट नेतृत्व समाजाला दिशा देेणारे नसून घातक असते असे पत्रकार सुरेश  जगताप यांनीी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.