आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा ,तसेच संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत.: संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज :, मो.९१५८४१७१३१. मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ महाराष्ट्रातील भाबड्या जनतेने नेमका विश्वास कोणावर ठेवावा हि बाब काळजाला काळजीत घालणारी ठरली आहे.काय होणार ह्या आम जनतेच मंत्री एका पाठोपाठ एक याप्रमाणे कोठडीत जाण्या साठीच आटापिटा करू लागले की काय ? म्हणून गफल्यात राहून गाफील होण्याचा मान घडी अर्थात घड्याळ निशाणी असलेल्या पक्षाच्या वाटेला यावे हे मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल.राष्ट्रवादीचा हा दुसरा मासा ईडी कडे असलेल्या जाळ्यात अलगद ओढले जात आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीच्या महा नेत्याची ह्या वयात ओढाताण होऊन डोके दुखीं वाढते आहे.त्याचे कारण असे की सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी सुत ( संबंध ) ठेवणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बुधवारी कोठडीत केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मध्ये खळबळ माजली आहे तर राष्ट्रवादीचे च मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे मत ईडी ने तपास करून व्यक्त केल्याचे म्हणणे आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अब्रू पुन्हा एकदा वेशीवर टांगून नेत्यांच्या कमावलेल्या इज्जतीस बट्टा लागल्याचे समोर आले आहे. तर अजून किती वेळा बट्टा लागणार ? ह्या विवंचनेत राष्ट्रवादीच्या नेत्यांची टिक टिक तर अजून किती बरबटले जाणार आणि आम् जनतेच काय होणार ? ह्या चिंतेत सामान्य नागरिक पडला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे घडी बांधणारे नेते नवाब मलिक यांना सक्त वसुली संचालयाने ( ईडी ) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी बुधवारी अटक करून ३ मार्च ०२२ पर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली.नंतर गुरुवारी मलिक यांनी केलेल्या काही मागण्या सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए ने मान्य केलाने मलिक यांना धीर मिळाला. दाऊद इब्राहिम ने क्रिकेट सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केला म्हणून सक्त वसुली संचालयाने ( ईडी ) दाऊद आणि त्याच्या नातेवाईक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता .याप्रकरणी ईडी ने दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यास ताब्यात घेतले.दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडी च्या अधिकाऱ्यांना तपासात आढळले. त्यामुळे राष्ट्रवादीचा मंत्री असलेला मलिक यांनी ईडी वाल्यांनी जाळ्यात अलगद ओढले.आणि दुपारी अटक केली. बुधवारी रात्री उशिरा सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालयाने मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली तेव्हा मलिक यांच्या वतीने काही मागण्या न्यायालयाकडे करण्यात आल्या .न्यायालयाने मलिक यांचे वय पाहता त्यांना सोबत औषधे, ईडी कोठडीत घरचे जेवण आणि चौकशी दरम्यान वकिलांना उपस्थित राहण्यास परवानगी आदी,मागण्या न्यायालयाने मान्य करून मलिक यांना चांगले उभे राहण्यास न्यायालयाने एक चांस मोठीच उभारी दिली.
