छ्त्रपती शिवरायांचे भविष्यात दैविकरण झाले तर …?

0
221

महारष्ट्र राज्यात सर्वत्र पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक घराघरात आणि प्रत्येकाच्या मना मनात असणारे निर्भिड, सडेतोड,परखड विचाराचे आणि ५९००० + पुढील वाचक संख्या असलेले क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज करीता आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१                                                   पुणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : शिवाजी महाराज विशेष _
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती अभूतपूर्व उत्साहात पार पडली , जगात देशभरात हा जल्लोष लोकसिद्ध झाला मात्र याच सोबत एक कर्मकांड घडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आरती गायल्या गेल्या,महाराजांची स्तुती आणि स्तवन यातला फरक शिव भक्तांना कळण्या पूर्वीच दैविकरणाचा श्रीगणेशा झाला.गर्दीच्या आड छत्रपती शिवाजी महाराज यांचे दैवीकरण साधल्याचे चित्र कुणाच्या लक्षात देखील आले नाही,बहुजनाचा प्रेरणा स्त्रोत देव करून निस्तेज करण्याचे कर्मकांडी षडयंत्र तडीस गेल्याचे चित्र आहे. लोक अंधश्रद्धेला बळी पडतात आणि मग तिथे कर्मकांडी दुकाने स्वतचा उद्धार आणि मोक्षाच्या नावाने वास्तव जीवनाचा नर्क करणारे एक षडयंत्र होय.हिंदुत्वाच्या नावानं माथी भडकवणारे संघी किडे शिवरायांची जयंती शाखेत साजरी करताना दिसत नाहीत पण तेच लोक शिवरायांचं दैवतीकरण करुन त्यापासून त्यांची अजून एक दुकानदारी सुरु करण्या साठी टपून बसलेले आहेत छत्रपती शिवरायांच्या कार्याला दैववादी करून त्यांच्या नावाने मंदिरे उभा करू त्यांची पूजा अर्चा करून देवत्व देण्याचा व त्यावर पोटभरण्याचा काही लोकांचा मानस आहे. शिवरायांचा ज्वलंत धगधगता इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे आरती नको शूरवीर पराक्रमी युग प्रवर्तक महा मानवाची आरती नसते तर पोवाडा किंवा वंदना असते.कर्मकांड्यानों लक्षात ठेवा.

कुठल्याही कार्यासाठी कोंबड्या बकऱ्याचा बळी न देणारा जगातील एकमेव राजा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्या ही देवाचे नाव नाही, गणपतीचे सुद्धा नाही.शिवराय कुठेही लिंबू मिरच्या बांधत बसले नाहीत, की देव देवऋशी करत बसले नाहीत.ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी जाऊन समुद्रात आरमार उभारले.गड जिंकल्यावर तिथे सत्य नारायण कधी घातला नाही अमावस्या अशूभ मानली जाते.पण महाराजांनी अमावस्या दिवशी गड जिंकले,पण आपण काही नकली लोकांच्या सांगण्यावरून कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या. कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक मोहिमा अमावस्येला घेत. गनिमी कावा पद्धती ने लढाया करायचे व जिंकायचे माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत महाराजांनी दैववाद,मुहूर्त पंचांग कर्मकांड अंधश्रद्धा कधीच मानली नाही,कारण त्यांचा मेंदूवर व मनगटा वर पुर्ण विश्वास होता.छत्रपती शिवाजी महाराजांना देव्हाऱ्यात बसवून त्यांची आरती करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे,त्यांचे दैवतीकरण करून त्यांचे कर्तृत्व नाकारू नका,देव म्हटलं की दैवी शक्ती आली.आणि जादु चमत्कार आले.परंतु महाराजांनी अपार कष्टातून आपल्या शौर्यावर पराक्रमाच्या जोरावर अठरापगड जातींचे शिवस्वराज्य उभे केले आहे. त्यामुळे भविष्यात असेच दैवतीकरण होत राहिले तर अवघड आहे.दैवीकरण झाले की पराक्रम शुन्य होत असतो महामानवाची आरती नको तर पोवाडा किंवा जिजाऊ वंदनाच व्हावी…

१९ फेब्रुवारी शिवजयंतीला बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचा प्रकार दिसून आला. काही वर्षांनी शिवाजी महाराज हे रामाचेच अवतार आहेत असा जावई शोध लागण्याची शक्यता नाकारतां येणार नाही.काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा हातांचे चित्र काढून त्यांचे होत असलेले दैवतीकरण पुण्यात हाणून पाडले होते.हे मनुवादी लोक उद्या महाराजांना आठ हात चार मूंडके दाखवायला मागे पूढे पाहणार नाहीत. त्यासाठी छञपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण थांबवले पाहिजे ,छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य एका विशिष्ट जाती धर्मापुरते मर्यादित नव्हते.ते अठरापगड जातीचे होते त्यांच्या सैन्यामध्ये हिंदू मुस्लिम कुंभार,साळी,माळी, धनगर रामोशी महार असे तळागाळातील लोकांचा भरणा होता आणि त्यांना संबोधन दिलं होतं ”मावळा”

छत्रपती शिवाजी महाराज एक विज्ञानवादी राजे होते त्यांनी कधीच त्यांच्या आयुष्यात मुहूर्त पाहिला नाही, कोणत्याच गडाची वास्तुशांती केली कधीही त्यांनी कोणता नवस केला नाही. कि सत्यनारायण घातलं नाही अनेक लढाया अशुभ मानल्या जाणाऱ्या अमावस्येच्या रात्री लढल्या आणि जिंकल्याही.सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे देव किंवा अवतार नव्हते,अवताराचा जन्म आकाशातून, किंवा पाताळातून, खांबातून होत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तुमच्या आमच्या सारखा झाला होता, ते शहाजी राजे जिजाऊचे पुत्र होते,परंतु काही कर्मकांड परंपरावादी लोक त्यांना अवतार म्हणून कर्मकांडा मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत , तसेच एखाद्याला जर देवत्व लावलं तर त्या व्यक्तिचं कर्तुत्व संपत आणि आपण सामान्य लोकही त्यांच्यासारखं वागण्याच्या जबाबदारीतून मुक्त होतो. अर्थात छञपती देव नव्हते तर ते एक ज्ञानी, दूरदृष्टी आदर्श महामानव होते.हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे शिवाजी हे फक्त नाव नसून ते कर्तुत्व आहे. विचार आहे…

त्यामुळे छञपती शिवाजी महाराजांची आरती नको जिजाऊ वंदनाच व्हावी,देवत्व बहाल केले की कर्तृत्व मागे पडते जिजाऊ वंदनेच्या माध्यमातून एकाच वेळी शिव पार्वती लोक कल्याणकारी राजा बळीराजा शहाजी राजे,जिजाऊ विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराज या महामनावांना वंदन केले जाते, भय मुक्त गुलामीमुक्त समाज,कसलेही दुःख,दैन्य वा उणीव नसलेला समाज बनवण्याचा विचार, नवसंस्कृतीने व जागृतीने प्रकाशमान झालेली मने व त्यामनात सर्व अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा संत विचार आणि शिव विचार म्हणजेच शिवधर्मअनुकरण्याचा अनमोल संदेश देणारी जिजाऊ वंदना आज लोकमान्य व जगमान्य झाली आहे त्यामुळे जिजाऊ वंदना मागे पडावी आणि आरती पुढे यावी या उद्देशाने रुजवलं जाणारं कर्मकांडी षडयंत्र ओळखणं व ते लवकरात लवकर रुजण्या आगोदार हाणून पाडनं गरजेचं आहे..आपण तारखे साठी लढलो,आता दैवती करण डाव हाणून पाडण्यासाठी लढू माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाचीही गरज संपतेअनुकरणाची ही गरज संपते.हे सारं वेळीच समजून घ्या शिवप्रेमी बंधू-भगिनीनों…

डॅा. आ.ह. साळुंखे सर सांगतात त्याप्रमाणे आपल्या धडावर आपले डोके ठेवा,व ते वापरा..बळी पडू नका. सजग रहा.जागृत रहा.भावनेला बळी पडू नका. प्रस्थापितांना तेच हवे आहे. मानसिक गुलामीतून बाहेर याआपल्या राजांचे दैवतीकरण होऊ देऊ नका. त्यांचे विचार डोक्यात आणा.डोक्यावर घेऊन त्यांना नका मिरवू. त्यांचे शौर्य गान जरूर गा.खड्या आवाजात पोवाडे गा. पण त्यांची आरती दैवतीकरण करत नका बसू. लग्नातही शिवरायांचे पूजन जरूर करा पण जिजाऊ वंदना म्हणा.शिववंदना करा घोषणा द्या. पण दैवतीकरण पंचारती अजिबात नको…।
लेखक – शिवश्री संतोष शकूंतला
आत्माराम बादाडे
9689446003
जिल्हाध्यक्ष पुणे
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
महाराष्ट्र राज्य..🚩🙏🏻🤝💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here