संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत तसेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज :मो.९१५८४१७१३१ महाड : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : निलेश लोखंडे _
मिळालेल्या माहितीनुसार अनुसया बाळाराम साळवी वय वर्ष 90 रा. वराठी बौद्धवाडी ,अनुसया साळवी या सतत आजारी असायच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे वेळेवर उपचार घेण्यासाठी पैसे मिळत नसत. कसेबसे वारंवार उपचार करूनही आजार बरे होत नाहीत. यामुळे तिने आजारपणाला कंटाळून आपल्या राहत्या घरात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये अनुसया साळवी या गंभीर रीत्या भाजल्या कारणाने त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अनुसया साळवी यांना एक मुलगा, एक मुलगी, दोन नातू, एक सून असा मोठा परिवार आहे. सदर घटनेची माहिती महाड तालुका पोलीस स्टेशन यांना कळताच महाड तालुका पोलीस स्टेशन यांनी महाड ग्रामीण रुग्णालय मध्ये धाव घेत अधिक तपास प्रक्रिया सुरू केली आहे. अनुसया साळवी या 80 ते 90 टक्के भाजल्या मुळे त्यांना अधिक उपचाराकरिता मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस करीत आहेत.
