राज्यात सर्वत्र पत्रकार नियुक्त करण्यात येत आहे तसेच जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज ,मो.९१५८४१७१३१ देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ नाशिक जिल्ह्यातील देवळा,चांदवड आणि मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे साठ लखांचा चुना लावून टोळीने पलायन केल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. रक्त चंदनाची झाडे लावा आणि लाखो रुपये कमाऊन मालामाल व्हा असे आमिष दाखवणाऱ्या टोळी सक्रिय झाली असून ह्या ह्या टोळीने देवळा ,चांदवड,मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि शेतकऱ्यानं कडून लाखो रुपयांची माया उकळवून पोबारा केल्याने शेतकऱ्यांनी देवळा पोलिसात धाव घेतली आणि आपली कैफियत मांडली.याबाबत समजलेली हकीकत अशी की काही दिवसांपूर्वी तामिनाडू आणि आंधरप्रदेश मधील हरामी लोक देवळा तालुक्यातील गिरणारे, कुंभार्डे तर चांदवड ,मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना गाठून हरामखोरी केली की तुम्ही रक्त चंदनाची झाडे लावा आणि लाखो रुपये कमवा ७/८ वर्षांनी आम्ही १० हजार रुपये प्रति किलो ने तुमचा माल घेऊ सद्या तुम्ही २०० रू.प्रती रोप ( झाड ) घ्या त्याच बरोबर आम्ही तुम्हाला ठिबक सिंचन ,बोअरवेल, तार कंपाऊंड करून देऊ ही शासकीय योजना आहे असे शेतकऱ्यांना सांगून शेतकऱ्यांना मोह आवरला गेला नाही आपण काही वर्षातच श्रीमंत होणार अशा भाबड्या समजुतीने शेतकऱ्यांनी रक्त चंदनाची रोपे घेण्यास सुरुवात केली कोणी ८०० रोप ,कुणी ३०० तर कुणी १२०० झाडांची रोप विकत घेतली काही दिवस ही चांडाळ चौकडी अर्थात हे नालायक लोक शेतकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांचे कडे येत जात राहिली आणि म्हणायचे की हम बालाजी वाले है हम झुट नहीं बोलते असे सांगून अवघ्या काही दिवसात येथील तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे साठ लाखांचा चुना लावून टोळीने पलायन केले.शेतकऱ्यांनी त्यांना मोबाईल फोन द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येत असल्याने तेव्हा कुठे शेतकरी थरथराट करू लागला की आपण फसलो आपले रक्त पिऊन हरामी टोळीने नालायकी केली म्हणून पोलिसांची मदत घेण्या पलीकडे आता काही म्हणून फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केली असून ज्या कोणी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असेल अशा शेतकऱ्यांनी तात्काळ देवळा पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी देवळा येथे येऊन केले आहे.
