वडिलांना भेटायला आलेल्या दिपालीला विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू ,महाड तालुक्यातील घटना

0
60

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी ताज्या बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.तसेच संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत.संपर्क : भारत पवार ; मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१.               महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : ५९००० +.                  महाड : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ निलेश लोखंडे :

 

 

मिळालेल्या माहितीनुसार दिपाली नितीन साळुंखे वय ३० रा. सोलमकोंड, या आपल्या वडिलांच्या घरी जिते या गावी आली असता सकाळी १०:३० च्या सुमारास आपल्या मुलांसाठी हिटर लावून पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. थोड्याच वेळात पाणी गरम झाले आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी दिपाली हिने त्या गरम पाणी करण्यासाठी हिटर लावलेल्या बालदी मध्ये हात टाकला असता तिला मोठ्या प्रमाणात शॉक लागला. शॉक लागल्यामुळे दिपाली हिला महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरता आणली असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यू अशी करण्यात आली असून त्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक मारुती आंधळे व पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पांडुरंग शास्त्री हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here