June 27, 2022

शेकाप भाजपा सारखी नौटंकी करत नाही : आ. जयंत पाटील

1 min read

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले परखड ,निर्भिड “महाराष्ट्र न्यूज “वेब चॅनल साठी संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा… संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१ 

अलिबाग : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : अमुलकुमार जैन _ 

कुर्डुस जिल्हापरिषद मतदारसंघातील चिखली प्राथमिक केंद्रासाठी जागा ही आपण घेतली असून त्याबाबत करारही केला आहे असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आमदार जयंत पाटील यांनी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण सोहळा कार्यक्रमात केले.
यावेळी आमदार जयंत पाटील यांनी सांगितले की,जगात देशाची उंची ही कशावर मोजली तर ती ऑलम्पिक या खेळात किती पदके मिळाली आहेत त्यावर.पंतप्रधान मोदींना धन्यवाद देईन की,त्यांनी ऑलम्पिक यजमानपद भारताकडे घेतले आहे.रायगड जिल्हा नियोजनमध्येही आपले प्रस्थ आहे.राजकारणाची चक्रे रायगड जिल्ह्यात आम्ही फिरवू तशी फिरतात आमच्या विरोधात गेले तर चक्रे उलटी फिरवण्यास वेळ लागणार नाही.पोयनाड विभागाचा विकास हा शेकापने केला आहे पोयनाड नागोठणे रस्ता हा निव्वळ आमच्यामुळे झाला आहे.
शेकापच्या पाठिंब्यामुळेच अदिती तटकरे या पालकमंत्री पदावर विराजमान झाल्या आहेत, याचा विसर त्यांनी कदापि पडून देऊ नये, असा सूचक इशारा शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी चिखली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी तटकरे यांना दिला आहे.पालकमंत्री अदिती तटकरे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होत्या. पण, त्या न आल्याने आ.जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्या पालकमंत्रीपदावर बसल्या आहेत त्या शेकापमुळेच याचा विसर त्यांना पडू नये, असे वक्तव्यही त्यांनी केले. यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्रातील उत्तम सेवा पुरविणार्‍या हॉस्पिटल्समध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्राचा पहिला क्रमांक लागेल. अपेक्षांच्या पलिकडे जाऊन चित्रा पाटील यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र साकारले आहे.पोयनाडच्या विकासासाठी शेकाप कायम कटिबद्ध असून पोयनाड रस्ता आणि परिसराचा विकास शेकापनेच केला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात सिटीस्कॅन मशिनदेखील लवकरच आणण्यात येईल.
कोव्हिडं काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात चित्रलेखा पाटील यांनी ज्या खाटा दिल्या आहेत त्याप्रकारच्या खाटा चित्रलेखा पाटील यांच्याकडून मागून घ्या अशी सूचना जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील यांना केली.सर्वसामान्य जनतेचा पक्ष हा पक्षाचा शेकापअसून त्यांचा आत्माही असून त्यांच्या विकासासाठी शेकापने कायम प्रयत्न केले आहेत.असे आ.जयंत पाटीलयांनी यावेळी सांगितले.
शेकापच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महाद्वार खुले केले. त्याचप्रमाणे आता शेकाप क्रिडा क्षेत्रात आवड असणार्‍या खेळाडूंसाठी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्याकडे भर देत आहे. पोयनाड परिसरातील अनेक खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करुन परिसराचे नाव उंचावले आहे. या विभागातील खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शेकापच्या माध्यमातून भव्य स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यात येईल. जेणेकरुन या परिसरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उंचावेल.असा विश्‍वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांना घेतल्याशिवाय कोणालाच राजकारण करता येणार नाही. शेकापक्ष कधीच कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करत नाही आणि दुसर्‍याने तसं आमच्या बाबतीत केलं तर आम्ही सहनपण करत नाही. शेकापक्ष लाटेवर नाही तर विकासकामावर निवडून येतो. शेकाप भाजपासारखी नौटंकी करत नाही. बंगले नसले तरी बंगले आहेत असे सांगून बातमी लावणार परत खोटं बोलणार, हे शेकापच्या भुमिकेत बसत नाही. जयंत पाटील यांच्या कृपेमुळे तटकरे आज दिल्लीत आहेत. पण आदिवासी नागरिकांसाठी उभारलेल्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी निमंत्रण असूनही त्यांच्यासह पालकमंत्री आले नाहीत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 सदस्य तर शेकापचे 22 तरी निधी वाटप समान होतो. ही विचार करण्याची बाब आहे असे ते म्हणाले.
रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांनी सांगितले की ,शेतकरी कामगार पक्ष हा दुसऱ्याच्या कामाचे कधीही श्रेय घेत नाही.ज्यांनी मला मतदान केले आहे त्याला मी विकास कामाबाबतचा जाब देण्यास मी बांधील आहे.विरोधक यांनी कंपनीच्या सीएसआर फंडातून आलेल्या कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन केले.तसेच भारत सरकारच्या बीएसएनएल टॉवरचे उदघाटन यांनी केले.हा त्यांचा बालीसपणा आहे.पाटील घराण्याने तीन “स”शिकविले आहे.ते म्हणजे पाहिले संयम,दुसरे सद्सद्विवेक बुद्धी आणि तिसरा सदाचार.मात्र विरोधक हे माझ्या सारख्या महिला लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका करत आहे म्हणजे ते किती खाली पातळी उतरत आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले की ज्यांनी एका रात्रीत जी पाटी लावली आहे ती निघाली पाहिजे .यासाठी जो तांत्रिक लढा द्यायचा आहे तो देण्यासाठी आमदार जयंत पाटील,माजी आमदार पंडित पाटील,माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील,जिल्हा परिषद सदस्य पप्पूशेठ पाटील यांची मदत लागणार आहे.जिल्हा परिषद मध्ये जी कामे करत असताना विकास कामे कशाप्रकारे करता येईल यासाठी आम्ही बांधील आहोत.

यावेळी माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, जि. प. अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, अ‍ॅड.सभापती निलिमा पाटील जि.प. सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील, जि. प.सदस्या चित्रा पाटील,सीईओ डॉ. किरण पाटील, सभापती प्रमोद ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे,माजी उपसभापती संदीप घरत,प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.