
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा : संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१
देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क : _ देवळा _ नाशिक महामार्गावर भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर दोन सख्खे भाऊ अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे प्रथम दर्शनी समजते. ह्या महामार्गावरील गेल्या काही महिन्यां पूर्वी अपघात घडला होता ह्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता.ह्या घटनेस काही महिन्यांचा कालावधी गेला असता अगदी त्याच जागेवर हॉटेल इंद्रायणी समोर आज दुपारी १ ते १.३० वा.दरम्यान आयशर ने दू चाकी स समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जण मागेे असलेल्याया ट्रॅक्टर वर धडकल्याने एक एक जण जागीच मृत्युमुखी झालाा तर दोघे सख्खे भाऊ अत्यवस्थ अवस्थेत असल्यााने त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक हुन देेवळ्या कडे भरधाव वेगाने जाणारा आयशर आणि देवळ्या कडून नाशिक कडे जाणारी दुचाकी (क्र.MH.41 AF 5957) स जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जण मागील ट्रॅक्टर वर धडकल्याने अमोल खैरनार ( वय अंदाजे ३०) हा जागीच ठार झाला तर गणेश विजय पगारे ( वय २५), सोमनाथ विजय पगारे ( वय ३३) तिघे रा. मुळाने यांना गंभीर दुखापत झाली असून देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारार्थ एकास मालेगाव तर एकास नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील धडक दिलेल्या आयशर ने घटना स्थळावरून लागलीच पलायन केल्याने देवळा पोलिसांनी शोध मोहीम जारी केली आहे .याकामी हॉटेल दुर्गा चे संचालक संदेश गुंजाळ ,हॉटेल इंद्रायणी चे संचालक निलेश गुंजाळ व अन्य नागरिकांनी घटनास्थळी घाव घेत मदत कार्य केले .
