कालच्या अपघातातील दुसऱ्याचाही मृत्यू, बागलाण तालुक्यातील मुळाणे गावावर भीषण शोककळा
1 min read

मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क : _ देवळा येथील नाशिक हायवेला झालेल्या तिहेरी भीषण अपघातात मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना सोमनाथ विजय पगारे (३३) याचीही मृत्य झाला असून बागलाण तालुक्यात भीषण शोककळा पसरली आहे. दरम्यान काल रात्री उशिरा पर्यंत अपघातातील आयशर चा तपास न लागल्याने पोलिसांना आव्हानच ठरले आहे. काल सोमवार दि.२१ फेब्रुवारी ०२२ रोजी हॉटेल इंद्रायणी समोर दुपारी १.३० वाजे.दरम्यान भीषण अपघात घडला होता याबाबत कालच सविस्तर वृत्त ” महाराष्ट्र न्यूज ” च्या वाचकांसाठी प्रसारित करण्यात आले होते.या तिहेरी अपघातातील एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर दोघे गंभीर जखमींना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलऊन वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश आहेर यांनी उपचार करून पुढील उपचारार्थ सोमनाथ विजय पगारे (३३) यास मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर गणेश विजय पगारे (२५) यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हे दोघे सख्खे भाऊ मृत्यूशी झुंज देत असताना मालेगाव येथे दाखल करण्यात आलेला सोमनाथ पगारे याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने सबंध बागलाण तालुक्यातील शोक कळा पसरली आहे.तर गणेश हा मृत्यूशी झुंज देत आहे. देवळा येथील पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांचे मार्गर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे ,पो.हवा.शेख हे पुढील तपास करत असून आयशर चा रात्री उशीर पर्यंत तपास न लागल्याने पोलिसांना आव्हानच ठरले आहे.अवघ्या दोन ते तीन महिन्यात याच महामार्गावर हा दुसरा अपघात असून सहा जणांना आपला जीव गमवावा लागला.ह्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल दुर्गा व हॉटेल इंद्रायणी ह्या ठिकाणी स्पीड ब्रेकर घालणे जरुरीचे झाले आहे.
