शिव उत्सव निमित्ताने मालेगावच्या आश्रयआशा फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
1 min read

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी ताज्या घडामोडी आणि जाहिराती करीता संपर्क करा…संपर्क : भारत पवार :, मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१
सोनज / मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवीमळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी शिवव्याख्याते श्री. सचिन मोरे सर यांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. तसेच आश्रयआशा फाउंडेशन या संस्थेमार्फत संस्थेचे अध्यक्ष तथा युवा मराठा न्यूजचे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन युवा मराठा शिवजयंती विशेषांक प्रकाशन देखील करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ पंडित बच्छाव गुरुजी हे होते. तर कार्यक्रमास पं.स.सदस्य गणेश खैरनार, व-हाणेचे किसन रुंझा पवार, आश्रयआशा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र तुकाराम पवार, सचिव श्रीमती आशाताई बच्छाव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंढरीनाथ अहिरे, शिवजन्म उत्सवाचे प्रमुख जिभाऊ देवरे, जितु दादा खैरनार, अमोल दुकळे, नामदेव बोरसे, अशोक कदम, पुंजाराम कदम, विश्वास खैरनार, समाधान सूर्यवंशी, तुषार सूर्यवंशी,चंदुलाल वाघ, राजेंद्र बच्छाव, सचिन खैरनार, राजेंद्र खैरनार, ऋषिकेश खैरनार, गौरव खैरनार, आश्रयआशा फाऊंडेशनचे संचालक रविंद्र बोरसे, संदीप धोंडगे, शाळेतील माजी विद्यार्थी तसेच परिसरातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रशांत कुलकर्णी व संदीप दुकळे सर यांनी परिश्रम घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात असणारा शालेय विद्यार्थी साईराज देवरे याचे उपस्थितांनी कौतुक केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी केले तर आभार सहशिक्षक संदीप दुकळे सर यांनी मानले
