आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क : संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , मो.९१५८४१७१३१ नामपूर : प्रतिनिधी : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा नामपूर येथील मानवता प्रतिष्ठान ॲपे पिकअप चालक मालक संघटना तसेच संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली व त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरे व माजी पोलीस अधिकारी श्री गोरखराव चव्हाण यां वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार श्री छोटु काका सावंत व श्री गोरखराव चव्हाण यांनी अर्पण केले व त्याचवेळी मुस्लिम मावळा पठाण दादा यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले व यावेळी सदर जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते छोटु काका सावंत, तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हयाचे नेते श्री गोरखराव चव्हाण अन्याय आत्याचार निर्मूलन समितीचे बागलाण तालुका उपाध्यक्ष हेमंत भाऊ सुर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ काळे भारत शेवाळे उद्धव पगारे व मानवता प्रतिष्ठानचे सर्वच मावळे सदर कार्यक्रमास उपस्थित होते त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरे यांनी आपल्या भाषणातून मानवता प्रतिष्ठान नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक व धार्मिक कार्य राबवत असते व त्यावेळी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी असोसिएशन व नामपूर शहरातील सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक स्तरावरील मान्यवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले व उपस्थित होते व आलेल्या सर्व मान्यवरांचे चालक मालक संघटनेचे संस्थापक समाधान भाऊ देवरे यांनी सर्वांचे आभार मानले .
