
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा… संपर्क : भारत पवार :, मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१ पुणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : साधारण चाळीस वर्षापूर्वी जनमानसावर विशेषतः विद्यार्थ्यांवर असा एक पगडा घट्ट पकडून होता तो म्हणजे शिवाजी महाराजांना साक्षात भवानी देवीनेच तलवार भेट दिली होती.तशा छायाचित्राला खूपच मागणी असायची. आता तसे कोणी म्हणत नाही.पण सद्या तलवार कोठे आहे याबाबत बरेच कुतूहल आहे.जगरहाटी प्रमाणे मनुष्य कोणतीही वस्तु अनेक स्वरूपात वेळो वेळी वापरतो. महाराजांनी अनेक तलवारी वापरल्या असतील. पण त्यापैकी तिन तलवारी प्रसिद्ध आहेत.भवानी,तुळजा आणि जगदंबा.
भवानी तलवार ही कोकणात महाराज दौ-यावर असताना खेम सावंत भोसले ह्या जहागिरदारांकडून भेट म्हणून मिळाली.ती पोर्तुगीज बनावटीची असून रत्न जडित आहे.वजन फक्त 1200 ग्रॅम. तुळजा तलवार शहाजी राजेंकडून भेट म्हणुन जेजुरी येथे मिळाली. तिसरी तलवार स्पेन देशाच्या बनावटीची असून तेथूनच राजांनी आपल्या सरदार व सैनिकांसाठी तलवारी आयात केल्या होत्या. त्यापैकी एक महाराजांची असून तिचे नाव जगदंबा आहे.ती तलवार मात्र इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये आहे बाकीच्या दोन मात्र कुठे आहेत याची नक्की माहिती नाही. माजी मुख्यमंत्री अंतुलेंनी पॅलेसमधिल तलवार मिळवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही.
महाराजांची अस्सल छायाचित्रे दोन चित्रकारांनी काढली आहेत.निकोलाय मनुची या प्रवासी व्यक्तीने पुरंधर तहाच्या वेळी मीर महंमद जाफर या कलाकाराडून सदर चित्र काढून घेतले.हे चित्र सुद्धा इंग्लडंच्या पॅलेस संग्रहात आहे.दुसरे चित्र सुरत स्वारीच्या वेळी डच चित्रकाराने काढले आहे.ते एमस्टरडॅम येथे सद्या आहे.
