निमगाव येथील टी .के .आर. एच.विद्यालयात दुसऱ्या टप्यातील कोवीड प्रतिबंधक लसीकरनास प्रारंभ

0
50

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील ५७९०० + वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत.तसेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१.          निमगाव ( मालेगाव ) : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : गोटू हिरे _ 
आज. दि. १७ फेब्रुवारी गुरुवार रोजी पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्या अंतर्गत निमगाव येथील टी.के.आर.एच. विद्यालयात निमगाव आरोग्य विभागाने पात्र विद्यार्थ्यांना कोवीड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यास प्रारंभ केला आहे. यावेळी मुख्याध्यापक श्री. के. डी. दाभाडे यांनी कोरोना विषाणू पासून बचाव करायचा असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. असे सांगून सर्वांनीच लसीकरण करून घेण्याचे आव्हान केले. आरोग्याधिकारी डॉ. माधुरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या श्रीमती आर. आर. अहिरे (आरोग्य सहाय्यिका) श्री. वाय. एन. नंदाळे (आरोग्य सेवक), श्रीमती पी. एच. बच्छाव (आरोग्यसेविका), श्रीमती सोनाली हिरे (आशा सेविका) यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण केले. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. बी. एन. पाटील, पर्यवेक्षक श्री. एन. एम. मांडवडे तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here