सटाणा नगर परिषदेच्या स्थापत्य अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा _ मागणी
1 min read

जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.तसेच महाराष्ट्र न्यूज साठी राज्यभरात ” पत्रकार ” नियुक्त करण्यात येत आहेत.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१

सटाणा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _
सटाणा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमाक नऊ हा येथिल लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे नेहमीच चर्चेत असताना, आता स्थापत्य अधिकारीही जनतेच्या रडारवर आले आहेत. यासाठी कारण म्हणजे ; ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथिल माजी नगरसेवक भगवान सोनवणे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती होणेबाबत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी तत्कालिन मुख्याधिकारी श्रीमती डगळे आणि सद्यस्थितीतील मुख्याधिकारी श्री. बागुल यांकडे पाठपुरावा केला असता, मुख्याधिकारी काम करण्यासंदर्भात स्थापत्य अधिकारी श्री. विसपुते यांना आदेश देतात तरी ‘आमच्याकडे किरकोळ कामासाठी टेंडर शिल्लक नाही, इतरत्र काम सुरु असल्यास रस्त्यावरील खड्डे बुजवून दिले जाईल, कंत्राटदाराला सांगीतले आहे, तो काम करुन देईल, अशी उडवाउडवीची उत्तरे देत. विसपुतेंनी कर्त्यव्यात कसूर केला आहे.
सदर खड्डे रस्त्याच्या मधोमध अत्यंत धोकेदायक असून, रहीवाशांच्या सामाजिक, वैयक्तिक, सुख-दु:खाच्या कार्यक्रमांनाही अडचणीचे ठरले आहे. अनु. जाती-जमाती, मागास घटकांच्या नागरी समस्यांकडे एखाद्या अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक दूर्लक्ष करणे हे कर्त्यव्यात कसूर मानले जाते, त्यामुळे संबंधित अधिकारी हा कारवाईस पात्र असून, त्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल व्हावा यासाठीचे ‘इशारा पत्र’ वंचित बहुजन आघाडी, नाशिक पूर्वचे जिल्हा प्रवक्ते अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी मुख्याधिकारी व प्रशासक यांकडे सादर केले.
येत्या दोन दिवसात काम पुर्ण न झाल्यास प्रभागातील अमरधाम येथे सुरु असलेले बांधकाम बंद पाडण्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल व याप्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, शासनाचे आर्थिक नुकसान झाल्यास संबंधित स्थापत्य अधिकारी विसपुते यांना जबाबदार धरण्यात यावे असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, तालुका महासचिव दादा खरे, शहराध्यक्ष जितेंद्र सरदार, अतुल शेजवळ, अरबाज बागवाण, मोंटी शिरसाठ, हर्षल सोनवणे, विशाल सरदार, साजन बाविस्कर, राहुल बच्छाव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.