१२वी वी च्या विद्यार्थ्यांना कोवेक्सिंन लसीचा दुसरा डोस तात्काळ द्यावा _ दीपक शिंदे

0
56

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील ५५८२० + वाचक संख्या असलेले परखड, निर्भिड विचारांचे प्रत्येकाचा घराघरात आणि मनामनात असलेले “महाराष्ट्र न्यूज ” साठी संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : ९१५८४१७१३१.                       पनवेल : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _  ४ फेब्रुवारी ०२२ पासून पनवेल महानगर पालिकेत कोव्हेक्सिन लसीचा तुटवडा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे.पहिला डोस घेतलेल्या १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना दुसरा डोस दिलेला नाही.इयत्ता १२ वी ची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा १४ फेब्रुवारी ०२२ पासून सुरू होत आहे लस घेतल्या नंतर काहीना ताप येणे,उलट्या होणे,डोके व अंग दुःखी ,चक्कर येणे यांसारखे त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर एवढ्या एक / दोन दिवसांत कोव्हाक्सिन लसीची उपलब्धता केली आणि प्रथम बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण केले तर विद्यार्थी – विद्यार्थिनी भयमुक्त होऊन परीक्षेस मुक्त पने बसतील.म्हणून बारावीच्या सर्व विद्यार्थी_विद्यार्थिनींना तात्काळ लस उपलब्ध करून लस द्यावी अशी मागणी खारघर मंडळ भाजपा सरचिटणीस दीपक शिंदे यांनी आ. प्रशांतजी ठाकूर , महापौर डॉ.कविता चौतमाल , आयुक्त गणेश देशमुख ,परेशजी ठाकूर, अड.नरेश ठाकूर ,संजना कदम ,जितेंद्र मडवी यांचे कडे मेल द्वारे केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here