अनुसूचित जातीच्या जनतेवर अन्याय आजवरचा इतिहास : अन्याय दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली मागणी, जि. प. निवडणुकी साठी ब्राह्मणगाव गट अ.जा.साठी राखीव करावा _ बापूराज खरे

0
68

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील ५५८०७ + वाचक संख्या असलेले प्रत्येक वाचकाच्या घराघरात आणि मनामनात असलेले “महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी संपूर्ण राज्यात ” पत्रकार ” नियुक्त करण्यात येत आहेत तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : ९१५८४१७१३१.                      ब्राह्मणगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव हे राजकीय क्षेत्रातील महत्वाचे केंद्र बिंदू आहे.या गावी अनुसूचित जातीच्या नागरिकांची लोकसंख्या अधिक आहे.असे असले तरी गेल्या अनेक शतका पासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक करीता राखीव जागा न ठेवता आजवर अनुसूचित जातीच्या समाजावर अन्यायच आहे हा आजवरचा इतिहास आहे अशी संतप्त प्रतिक्रिया अनुसूचित जातीतील नागरिकात व्यक्त केली जात असून सद्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ब्राह्मणगाव गट आरक्षित करण्यात यावा अशी मागणी आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष बापूराज खरे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे कडे केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी खरे आणि आबा सोनवणे ( मुंगसेकर )  यांचे नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी यांची पुनश्च भेट घेणार असेही खरे यांनी म्हटले आहे.                                                            आगामी होऊ घातलेल्या नाशिक जिल्हा परिषद व पंचायत  समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनुसूचित जातीच्या नागरिकांची मतदार संख्याा बागलाण तालुक्यात सर्वाधिक असलेल्या ब्राह्मणगाव  जिल्हाा परिषद गट हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात यावा अशी मागणी अनुसूचित जातीच्या समाजातील नागरिकांनी केलीी असूून याबाबत बापूराज खरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारेे मागणी मागणी केली आहे. निवेदनात म्हटलेेेे आहे की , आज पर्यंतच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वच निवडणुकांमध्ये बागलाण तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी अद्याप पर्यंत कोणताच गट आरक्षित करण्यात आलेलाा नााही. त्यामुळे अनुसूचित जातीच्या समाजावर हा एक प्रकारेेे अन्यायच असून अनुसूचित जातीच्या समाजातील तालुक्यातील गटामध्ये अन्याय आणि नाराजीचीी भावनाा निर्माण झाली आहे. संपूर्ण बागलाण तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद गटाचा विचार केलााा असता ब्राह्मणगाव या जिल्हा परिषद गटातच अनुुसूचित जातीच्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.त्यामुळेे गेेल्या  अनेक वर्षांपासून झालेल्या निवडणुका पाहता अनुसूचित जातीच्या समाजावर घोर अन्याय केलाा असून हा अन्याय दूर करून सध्या होऊ घातलेल्या नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीत ब्राह्मणगाव गट अनुसूचित जातीसाठी राखीीव करावा अशी मागणी समाजातील सर्वच नागरिकांकडून होत असून याबाबत बापूराज खरे आणि आबा सोनवणे( मुंगसेे कर ) व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी नाशिक यांची पुनश्च भेट घेऊन मागणी करणाार असल्याचे खरे यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here