रावळगावच्या ” कल्याणीने” प्रेम करून डाव साधला …लोहोनेरच्या” गोरखला ” त्याच्याच गावी जिवंत जाळला ! देवळा तालुक्यातील जळजळीत घटना …
1 min read
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती महाराष्ट्र भर पोहोचविण्या साठी क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज शी कायम संपर्कात रहा. आमचे महाराष्ट्रभरातील वाचक संख्या _ ५६००० + आहे. संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१. देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी :नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहोनेर गावी काल दुपारी भर रस्त्यावर घडले जळजळीत कांड…. देवळा तालुक्यातील लोहनेर गाव कोणत्याना कोणत्या कारणास्तव कायम चव्हाट्यावर येतच आहे वाळू माफिया असो किंवा अन्य कारणाने असो. प्रेम प्रकरणाच्या वादातून चक्क मुलीनेे आणि तिच्यााघरच्यांनी रौद्ररूप धारण करून क्षणार्धात होत्याचे नव्हते केले. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील कल्याणी नामक युवतीने देवळा तालुक्यातील लोहनेर येथील गोरख नामक युवकाशी प्रेेम करू डाव साधला …. मुुुलीने प्रेेम केलेे एकाशी आणि लग्नन जुळवले दुसऱ्याशी लग्न मोडल्याचेे संशय घेऊन रावळगाव येथील मुलीने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने मुलाच्या गावी लोहनेर येथे येऊन भर रस्त्यावर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक जळजळीत कांड घडले असून तालुक्यात मोठीच खळबळ उडाली आहे याप्रकरणी देवळा पोलिसांनी मुलीसह आई , वडील आणि तिचे दोन भाऊ असे पाच जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिििती मिळताच पोलीस उप अधीक्षक माधुरी कांगणे ,कळवण येथील उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनीी घटनास्थळाला भेट दिली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहिती बाबत लोहनेर येथील युवक गोरख काशिनाथ बच्छाव ( वय ३१) हा काहीी वर्षा पूर्वी रावळगाव येथील मुलीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम सबंध जुळले मात्र मुलीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न जमवले जमवलेले लग्न मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय बळावला म्हणून त्यास लोहनेर येथे येऊन त्याच्याा डोक्याात लोखंडी सळईने वार करून मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गोरख बच्छाव हा ५५ टक्के भाजला त्यास देवळााा ग्रामीण रुग्णालयात उपचाार करून पुढील उपचारार्थ नाशििक जिल्हारुग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळतात देवळा येथील पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे निलेश सावकार सचिन भामरे सुनील गांगुर्डे सुरेश कोरडे आदींनीी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी कल्याणी गोकुळ सोनवणे (मुलगी , वय २३), गोकुळ सोनवणे ( वडील ,वय ५७), निर्ममला सोनवणे (आई , वय ५२), हेमंत सोनवणे ( भाऊ ,वय 30), व प्रसाद सोनवणे ( भाऊ ,वय १८) यांना ताब्यात घेतलेेे असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व सहकारी करत आहेत.
