आमदारा पेक्षा ग्रामसेवक निघाला चतुर यार…!आमदार तुमच्या दारी ग्रामसेवकाने लावली गैरहजेरी

0
51

भारत पवार : मुख्य संपादक :९१५८४१७१३१

क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : सटाणा _प्रतिनिधी _  बागलाण तालुक्यातील सत्य परिस्थिती आमदार तुमच्या दारी उपक्रमाअंतर्गत बागलाण चे भाजपा आमदार दिलीप बोरसे यांनी ताहाराबाद नजिक असलेल्या साल्हेर ग्रामपंचायतीत नुकतीच बैठक आयोजित केली होती. बैठकीस विविध खात्यातील अधिकारी,कर्मचारी ,सरपंच,ग्राम. प.सदस्य  आणि ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.मात्र बैठकीकडे ग्रामसेकाने चक्क हुलकावणी देत पाठ फिरवल्याने मोठा चर्चेचा विषय ठरला. बागलाण तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील साल्हेर आणि जवळील दहा ते पंधरा पाड्यात (गावात) पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने तेथील आदिवासी लोकांना पाण्या साठी इतरत्र वणवण भटकावे लागते आहे सद्या तीव्र हिवाळ्यात पाण्याची तीव्र समस्या असून उन्हाळ्यात आदिवासी जनतेचे हाल कसे होतील ? याचा विचार सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.पाणी समस्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार बोरसे यांनी ” आमदार तुमच्या दारी” ह्या कार्यक्रमाअंतर्गत साल्हेर येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते मात्र साल्हेर येथील ग्रामसेवक गणेश जाधव यांनी चक्क गैरहजेरी लावल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे तर ग्रामसेवक नसल्याने एक चर्चेचा विषय ठरला चक्क भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत ग्रामसेवक जाधव यांनी गैरहजर राहून पाठ फिरवल्याने मोठे धाडस केले असेही गावात चर्चेच्या आणि आश्चर्यचकित करणारा विषय झडू लागला.यावेळी आमदार व अधिकाऱ्यांनी पाणी व्यवस्था कशी केली जावी,पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम स्वरुपी कशी मिटवली जाईल यासाठी जागेचा प्रश्न सुध्दा सोडविला असून लवकरच याकामी सुरुवात केली जाईल असेही आमदार बोरसे यांनी सांगितले.मात्र ग्रामसेवक गैरहजर असल्याचे कारण काय ? याची चौकशी करून ग्रामस्थांना न्याय दिला जाईल.असेही सांगण्यात आले. आमदार पेक्षा ग्रामसेवक निघाला चतुर यार..! असे काहीसे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here