स्थानिक गावासह महाराष्ट्रातील ५१९००+ वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहचविणारे एकमेव निर्भिड सडेतोड महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी जाहिराती आणि बातम्या करीता संपर्क करा..संपर्क:भारत पवार : मुख्य संपादक : ,मो.९१५८४१७१३१ कळवण : प्रतिनिधीी _ कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कनाशी येथे दिनांक १९ जानेवारी 2022 रोजी covid-19 चे सर्व नियम पाळून सहाय्यक जिल्हाधिकारीी तथाा प्रकल्प अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते अलेक्झा उद्घाटन करण्यात आले. देशात तंत्रज्ञान अधिग्रहण आणि जागतिकीकरण शिक्षण व्यवस्था खूप वेगाने बदलत आहे. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ तंत्रज्ञानावर आधारित आणि ऑनलाइन शिक्षणाचा आहे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अलेक्झां हा नवोउपक्रम कनाशी आश्रम शाळेत सुरू करण्यात आला आहे. डिजिटल क्रांती विद्यार्थ्यांच्या फायद्याची असून शिक्षणाचा वेग वाढणार आहे. त्याच बरोबर माननीय मीना साहेबांनी सर्व टीमचे कौतुक केले आणि हा उपक्रम इतर शाळांसाठी दिशादर्शक असेल असे सांगितले. विद्यार्थिनी अलेक्झा ला काही प्रश्न विचारून डेमो सादर केला त्याच बरोबर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ए एच सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन एन जे देवरे यांनी तर आभार प्रदर्शन अजय गुप्ता यांनी मानले .या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक डी पी पवार, जे व्ही गावित, टी ए चव्हाण,जी एन भरसट, के एस रौंदल, सी डी सोनवणे, आर आर चौरे, सी के बागुल, वाय एल पवार ,रोशन सूर्यवंशी टी बी पगार , ए एस बागुल,सोनोने सर, अष्टेकर मॅम, धाबळे मॅम, झनान मॅम चौरे व इतर कर्मचारी उपस्थितीत होते.
