June 27, 2022

एकाच आठवड्यात सात जणांना कोरोणाची लागण: उपसरपंच बापूराज खरे यांचे अध्यक्षतेखाली ब्राह्मणगाव तातडीची ची बैठक

1 min read

( ब्राम्हणगाव : आढावा बैठकीत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना उपसरपंच तथा आर.पी.आय.चे जिल्हा उपाध्यक्ष बापूराज खरे ,समवेत डॉ. राहुल कांबळे व अन्य पदाधिकारी ).                                                           स्थानिक गावासह महाराष्ट्रातील ५१०००+ वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहचविणारे एकमेव निर्भिड,सडेतोड महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी जाहिराती आणि बातम्या करीता संपर्क करा.      संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक :९१५८४१७१३१.                                                    ब्राम्हणगाव :        क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _

 

 

बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे एकाच आठवड्यात सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्राथमिक घ्यावयाची काळजी बरोबरच कोरोना नियमांचे पालन,व खबरदारी म्हणून उपाययोजनेबाबत गावातील खाजगी क्लिनिकचे डॉक्टर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी,आशा कर्मचारी, मेडिकल स्टोअर्स चे मालक,पॅथॉलॉजी लॅब चे संचालक या सर्वांना ग्रामपंचायतीच्या वतीने महत्वाच्या सूचना याकामी तातडीची बैठक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे व उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बापुराज खरे, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.
ब्राह्मणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला चौदा-पंधरा खेडी जोडलेली असल्याने नेहमीच ब्राह्मणगावांत नागरिकांची वर्दळ असते, गर्दीच्या ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही, सर्दी, खोकला असल्यास नागरिक खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करतात, कोरोना चाचणी ऐवजी फक्त सर्दी व खोकला यावर गोळ्या, सिरप,घेतात आणि योग्य निदान होत नसल्याने एका नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, म्हणून अस्वस्थ वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, सर्दी, खोकला असल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. राहुल कांबळे यांनी केले.
त्यानंतर डॉ. राहुल कांबळे यांनी गाव व परिसरात कोरोना प्रतिबंधक फवारणी करण्याबाबत, तसेच आठवडे बाजारात नागरिकांना कोरोनाचे नियमांचे पालन करणे, गावातून नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत महत्वाच्या सूचना फलकावर लिहावयास सांगितले. झालेल्या बैठकीत उपसरपंच श्री. बापुराज खरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णाची कोरोना आर.टी. पी.आर किंवा कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह असल्यास त्यांना विलीगिकरण किंवा होम क्वांरटाईन राहण्यासाठी सांगावे, तसेच गांव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांना लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे डॉ.राहुल कांबळे यांना सांगितले.
याप्रसंगी माजी सरपंच सुभाष अहिरे, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर अहिरे, सामाजिक कार्यकर्ते राजू(मेजर) परदेशी यांनी पन काही सूचना केल्यात, संदीपआबा अहिरे, यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.संजय पवार, प्राथमिक आरोग्य केंद्रातील गट प्रवर्तकश्रीमती स्नेहल लोखंडे, आरोग्य सेवक समाधान मोरे, आरोग्य सेविकाश्रीमती मणाली हिरे, आशा कार्यकर्त्या, कर्मचारी, समर्थ क्लिनिकचे डॉ. कपिल सोनवणे, गोतमाई क्लिनिकचे डॉ. सूर्यवंशी, आदर्श मेडिकलचे दिपक सूर्यवंशी, पारस मेडिकलचे दिपेश डांगी, गुलाब खरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.