स्वार्था साठी घड्याळ हरवले ..राष्ट्रवादी काँग्रेस झुकले… पुढील अडीच वर्ष घड्याळ बंद पाडले ? भाजप पुढे नतमस्तक होऊन गप्प बसले, एकाने तर जनहित ऐवजी स्व हिता साठी चक्क भाजपच्या दावणीला पसंत केले : देवळा येथील डुप्लिकेटांचा करिश्मा

0
76

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील ५०हजार नऊशे चे पुढील वाचक संख्या असलेले सत्याच्या शोधात राहून एकमेव  निर्भिड,सडेतोड,बेधडक बातम्या वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहचविणारे क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल. जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा : भारत पवार , मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१ .                                                                              भारत पवार l देवळा l क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील देवळा शहरातील नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक दुसऱ्या चरणातील प्रचारास सुरुवात झाली आहे.उमेदवारी माघारी नंतर खरे चित्र अर्थात नेते म्हणावे की संधी साधू म्हणावे हेच कळत नाही ? अश्यांचे असली चेहरे स्पष्ट झाले.प्रचार अंतिम टप्प्यात झुकला तशी येथील चमचेगिरी करणारे पण झुकले आणि जनतेचा मोठाच घात झाल्याचे उघडकीस झाले आहे.यास एकमेव पैदा झालेला हिरा तो हिराच म्हणावा लागेल देवळा नगरात असणारा उदय निंबाजी आहेर हा अजिबात कोणाच्या दावणीला बांधला जात नाही.त्यात सत्यता आणि जनहिताचे सळसळत रक्त आहे.भेसळ नाही.होईल ते होईल पण जनहित साठीच लढू आणि जन हित साठीच मरू अशी हाक देणारा आणि उरुन पुरून निघणारा उदय येणाऱ्या निकाल पेटीत उदय घेऊन येणारा असणार अशी चर्चा रंगू लागली आहे. असो.मुद्दा असा की विकला जात नाही यालाच म्हणतात स्वाभिमानी . इमान गहाण न ठेवणारा आणि इमान घाण न करणारा…. आणि हेच दल बदलू पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा भाजप विरोधी सामना करण्या साठी ह्याच उदय कडे गेली होती पण त्याच उदयने यांना उलटे पाऊल माघारी पलटवले.का ? त्यास माहीत होती यांची निती ? विळ्या भोपळ्याचे नाते असलेले एकेकाळी देवळा पाच कंदील चौक भांडणाने नव्हे मारा मारीने गाजून एकमेकांवर कुर घोडी करून दोघं पार्टी पोलिसात दाखल झाली होती.आणि आप आपल्या परीने वरिष्ठ नेत्यांना कळवून फिल्डींग टाईट केली होती.आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा सामना चुरशीचा खेळला.दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा सामना होणार जनतेस आस लागलेली की परिवर्तन पहावयास मिळणार आपापल्या डुप्लिकेट वरती त्यांचा(अं) विश्वास होताच.परंतु माघारीच्या दिवशी चक्क” विश्वास ”        पाणीपतला पाठवला तशीच प्रक्रिया राबविण्यात भाजपचा केदा “गोड ” ( गॉड नाही ) ठरला आणि अपक्ष गूजरे , राष्ट्रवादीचा आहेर यांना अलगद बाजूला करून माघार घेण्यास भाग पाडले.मग आहे की नाही गोड युक्ती .शेवटी हा केदा भाऊचा प्रतिष्ठेचा आणि जिल्हा अध्यक्षचा मोठा प्रश्न होता. अजूनही काही त्यामगचा हेतू आहेच. हे वाचकांना माहीत असेलच .अजून काय ते ? हे सांगण्याची गरज नाही . झाले काय माघारीच्या दिवशी लोकशाही वरती आघात ह्या लोकांनी केला.जर बिनिरोध करायचे होते तर  स्वतःची होती ती ( लायकी) तशीच ठेवायची होती. फॉर्म भरला नको पाहिजे होता. फॉर्म भरून सगळी प्रक्रिया करून माघार घेणे आणि जनमत न घेता स्वतःच्या विचाराने फार्मूला ठरवणे आणि माघार घेणे हे लोकशाही वरती घात म्हणजेच जनतेच्या ,मतदारांच्यa अधिकारावर आघात करण्या सारखे झाले. गेल्या अनेक वर्षांपासून भाऊबंदकीत खदखदत असलेल्या जखमेवर अडीच वर्षांचा मलम राष्ट्रवादीच्या “गोटुने ” लावत निवडणूक रिंगणातून सध्यातरी” पलायन ” करण्याचे पसंत केले. तर गेली १० वर्ष भाजपच्या पाठबळावर नगरसेवक राहून जनसेवा करणारे ? उल्हास यांना भाजपने दूर सारून उदासीन केले होते. शेवटी उल्हास अती उत्साह होऊन अपक्ष म्हणून रणनीती करून उमेदवार होऊन तेल लाईन दंड थोपटून रिंगणात उडी घेताच केदा भाऊंनी अलगद आपल्या काखेत ( बगलात ) घेतले आणि उल्हास तुलाही अडीच वर्षाचा मलम घेऊन देतो असे आहेर बंधूंनी सांगताच हे मलम लावण्यास राजी होऊन उल्हास गुजरे यांनी माघार घेतली.आज रोजी ह्या दोघा प्रभागात भाजप ने आघाडी घेऊन बिविरोध भाजप चे नगरसेवक करण्यात केदा जी पटाईत ठरलेत.तसेच एके काळी राष्ट्रवादीचा महामेरू राष्ट्रवादीच्या जीवावर अनेक वर्ष विविध पदे घेऊन प्रतिष्ठा मिळवून गेल्या काही महिन्यांपासून भाजपला आळवणी करून आपली असलेली प्रतिष्ठा गेली तरी चालेल पण नाना च्या मागे बसल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही जणू काही अशी शिव प्रतिज्ञा करून भाजप मध्ये शामिल होऊन कुठे ” शमिल ” झाले.असे जितू आहेर आपल्या प्रभागात ” स्व ” हिता साठी का होईना जीवाची पर्वा न करता ” बाजी ” लावत आहेत.मतदार यावर विचार करणारच की पुण्याहून ” पुनतांब्याला “जाण्याचा प्रकार का केला असावा ? अर्थात हे जे सगळ नाट्य घडलं ते खरोखर जनहित साठी नाहीच .हे जनतेने विचार करण्या सारखे आहे. येवढे कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही.हे तितकेच खरे आहे.कारण कोणीही खास जनविकास करण्या साठी पैदा झालेला नाही ? स्व विकास मग जनविकास होतो . जर स्व विकास साधला गेला तर त्याची अशी सैरभैर होण्याची वेळ येते मग कोणीही कोणाच्याही मागे बसण्यास तयार होतो.किंवा कोणताही फार्मूला स्वीकारण्यास तयार होतो. मला तरी वाटते कोणी कितीही काहीही खेळी केली बाकीची असलेली खेळी आता मतदारांवर आहेच.आपल्यावर आहे कोणाला उलथून टाकायचे ? कोणाला तरायचे ते ? वेळ गेलेली नाही.सगळे लायक उमेदवार आहेत परंतु आपल्या योग्यतेचा लायकीचाच उमेदवाराला निवडा आणि मतदान त्यालाच करा. बळीचा बकरा बनू नका .नाहीतर पाच वर्षे तुमचा ” बळी ” दिला असे म्हणन्याची वेळ आणू नका. एकूणच घडले आणि बिघडले ह्या घडामोडी वरून स्वार्था साठी घड्याळ हरवले…राष्ट्रवादी काँग्रेस झुकले की झुकविले ? हे राष्ट्रवादी युवकपदाधिकाऱ्याने दाखऊन दिले. पुढील अडीच वर्ष तरी घड्याळ बंद पाडले,भाजप पुढे नतमस्तक होऊन गप्प बसले अशी देवळा येथील “डुप्लिकेटांची खमंग ” गरम चर्चा देवळा गावात आणि तालुक्यात होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here