ब्राह्मणगाव ग्रामपालिकेने धरली विकासाची कास ..! सरपंच किरण अहिरे व उपसरपंच बापूराज खरे यांचा ध्यास गावाचा विकास..!! महिला सक्षमीकरण शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न
1 min read

आपल्या गावातील बातमी नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ५०,५००+ वाचकांच्या घराघरात मनामनात पोहचविणारे एकमेव निर्भिड सडेतोड महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल.. आपली जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क करा… संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज : 9158417131 बापूराज खरे l ब्राह्मणगाव lक स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : _

— महिला व युवतींमध्ये आर्थिक,सामाजिक, राजकीय सक्षमीकरण प्रक्रिया वाढीस लागावी यासाठी ब्राह्मणगाव ग्रामपालिकेच्या -15 व्या वित्त आयोग आराखड्यानुसार गावातील महिला व युवतींसाठी सात दिवसीय सक्षमीकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन बुधवार दि.12 जानेवारी रोजी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनी ब्राह्मणगाव येथील बृहत सहकारी सोसायटीच्या सभागृहात उत्स्फुर्तपणे संपन्न झाले.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ.लताताई बच्छाव, ,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.विलास बच्छाव, जेष्ठ नेते श्री.यशवंत बापू अहिरे,एम.व्ही.पी.संस्थेचे उपसभापती श्री. राघोनांना अहिरे, सरपंच किरण अहिरे, उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बापुराज खरे,ग्रामपालिकाचे जेष्ठ सदस्य श्री. अरुण अहिरे,श्री.रत्नाकर अहिरे,माजी सरपंच श्री.सुभाष अहिरे,यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.
तसेच मान्यवर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापूरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली.यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचे जेष्ठ नेते श्री.यशवंत बापू अहिरे श्री.राघोनांना अहिरे,जेष्ठ सदस्या सौ.,रेखा अहिरे,सौ.वंदना पगार यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी, उपसरपंच श्री.बापुराज खरे यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाबाबत तसेच ग्रामपालिका ब्राह्मणगाव मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांबाबत माहिती दिली.तसेच यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.लताताई बच्छाव, डॉ.विलास बच्छाव, यशवंत बापू अहिरे,सुभास अहिरे,बचत गटाच्या संयोजिका सौ.तनया शिरोडे,मासुम संस्था नासिक चे प्रमुख श्री.श्रवण देवरे यांनी यावेळी आपले मौलिक विचार व्यक्त केलेत.
या उदघाटन कार्यक्रमानंतर मासुम संस्थेच्या प्रशिक्षकांनी कौशल्य विकास प्रशिक्षण बाबत माहिती देऊन प्रत्येक्षात प्रशिक्षणास सुरुवात केली.तसेच यावेळी अंगणवाडी केंद्र ब्राह्मणगाव च्या सेविकांना घड्याळाचे वाटप उपसरपंच श्री.बापुराज खरे,ग्रामपालिका सदस्या सौ. रेखा अहिरे,सौ.वंदना पगार,सौ.रत्ना माळी,ग्रामविकास अधिकारी श्री.संजय पवार,यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ.लताताई बच्छाव, माजी जि. प. सदस्य डॉ.विलास बच्छाव, जेष्ठ नेते श्री.यशवंत बापू अहिरे, एम.व्ही.संस्था नासिक चे उपसभापती श्री.राघोनांना अहिरे,उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बापुराज खरे, ग्रामपालिका चे जेष्ठ सदस्य सर्वश्री अरुण अहिरे,श्री.विनोद अहिरे,रत्नाकर अहिरे,जनार्धन सोनवणे,माजी सरपंच श्री.सुभाष अहिरे,माजी उपसरपंच श्री.माधव पगार,जेष्ठ सदस्य सौ.रेखा अहिरे,सौ.वंदना पगार,सौ.रत्ना माळी, केदाभाऊ ढेपले,पोलीस पाटील सौ.वैशाली मालपाणी, ग्रामविकास अधिकारी श्री.संजय पवार,सामाजिक कार्यकर्ते बापू माळी,शामा माळी,माजी उपसरपंच श्री.विश्वास खरे,समाधान शेवाळे, गुलाब खरे,कैलास मालपाणी,प्रदीप सोनवणे, दीपक खरे,प्रमोद खरे, नाना अहिरे,दगा अण्णा अहिरे तसेच अंगणवाडी कर्मचारी, महिला बचतगट च्या अनेक महिला, युवती,तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सात दिवस चालणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून व मान्यवरांचे आभार उपसरपंच श्री.बापुराज खरे यांनी मानले.