डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रश्न २६ जाने.पर्यंत लोंबकळत ? उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यात आमदार यशस्वी, आमरण उपोषण पाचव्या दिवशी मागे
1 min read

फक्त पाच सेकंदात आपल्या स्थानिक गावांसह संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात वाचकांच्या मनामनात पोहोचणारे एकमेव चॅनल “महाराष्ट्र न्यूज” आपण आपली “जाहिरात “आणि तुमच्या परिसरातील दर्जेदार,निर्भिड,सडेतोड बातम्या देण्यासाठी संपर्क करा… भारत पवार ,मुख्य संपादक ,मो.9158417131.

श्रीरामपूर : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बाबासाहेब उबाळे यांचे कडून _ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे विश्वरत्न तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी येथील कार्यकर्ते रवींद्र वाहुळ, जनार्दन दुशिंग ,माधव झाल्टे ,भाऊसाहेब हिवाळे, वसंत गोरे ,गुलाब पठारे ,सूनील नरवडे आणि भाऊसाहेब व्हासाळे यांचे वर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ येऊन अखेर उपोषणाच्या पाचव्या दिवशी आमदार लहू कानडे यांना जाग आली आणि अर्धवट लेखी आश्वासन देऊन कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आमदार महाशय यशस्वी ठरले. हरेगाव येथे १६ डिसेंबर १९३९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः परिषद घेतली होती. म्हणून हरेगाव येथे स्वाभिमान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.हजारो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी जमतात.त्या जागेवर विश्वरत्न तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती आणि निधीही मंजूर होऊन कामाचे भूमिपूजन करण्यात आले परंतु जागे अभावी स्मारकाचा प्रश्न लोंबकळत असल्याने येथील अनुयायांना आमरण उपोषण सारखे शस्त्र उपसावेेलागले.गेल्या पाच दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास सुरुवाात केली. पाचव्या दिवशीी आ. लहू कानडे यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंतीी केलीी .आपल्याा लेेेेखी आश्वासनात भूमिपूजन 26 जानेवारी रोजी सर्व मिळून करू. मात्र प्रश्न असा आहे नेमकी 26 जानेवारी ..? कोणती ? 2022 कि 2023 की अजून कोणती 26 जानेवारी ? हे मात्र गुलदस्त्यात ठेवले. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे तर 4 नोव्हेंबर 2018 साली तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले तरीसुद्धा पुन्हा नव्याने भूमिपूजन करण्याची गरज आहेेे काय ? असाहीीी प्रश्न भीम अनुयायांना पडला असून कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी आमदारांनी ही खेळी खेळली तर नसेल ? अशी शंंंंका कार्यकर्त्यांच्या मनात घर करून आहे.आ. लहू कानडे याांनी आपल्या लेखी आश्वासनात 26 जानेवारी 2022 असेेस्पष्टपणे का उल्लेख केला नाही अशी चर्चा गावात रंगू लागली आहे.