विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : मंत्री के. सी. पाडवी यांचेसह ३४ जण कोरोना पॉझिटिव्ह ,रोज कोरोना चाचणी केली जाणार : आदित्य ठाकरे
1 min read

अवघ्या काही सेकंदात आपले स्थानिक गाव,प्रभागासह संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरातील वाचकांच्या मनामनात तुमची जाहिरात / बातम्या पोहचविणारे एक निर्भिड ,दमदार आणि सडेतोड ” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल. बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा मो. 9158417131.

मुख्य संपादक : भारत पवार
नागपूर : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून विधिमंडळात देखील कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांचेसह ३४ जणांना कोरोना झाल्याचे उघडकीस झाले आहे.दरम्यान अधिवेशन आज समाप्त होण्याची शक्यता आहे.राज्याचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर पासून सुरू झाले असून सुमारे २हजार ३०० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले त्यात ३५ जणांचेअहवाल पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले असून आदिवासी विकास मंत्री पाडवी , ०३ पत्रकार ,पोलिस कर्मचारी विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अधिवेशनचा आजचा शेवटचा टप्पा असून आज पासून रोजच कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ख्रिसमस, न्यू इयर असल्याने गर्दी वाढली आहे लोक जास्त काळजी घेत नाहीत लसीकरण झाल्यावरही प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे.वातावरण भीतीचे आहे शाळा,कॉलेज संदर्भातील निर्णय पुढील परिस्थीत पाहून घ्यावा लागणार आहे पुढच्या आठवड्यात शाळां बाबतीत निर्णय घेऊ असे ठाकरे यांनी म्हटले आहे.तसेच प्रत्येकाच्या मनात कोविड होऊन गेला,लस घेतली आहे त्यामुळे कोरोना होणार नाही असा गैरसमज आहे लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाही मास्क घालावाच लागणार आहे.आणि ज्यांनी लस घेतलीच नाही त्यांनी लस घेणे व मास्क वापरणे गरजेचे आहे.असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.