उत्तर महाराष्ट्र घाबरला….!आयकर अधिकाऱ्यांच्या धाडीत मोठे मासे अलगद गळाला,हजारो कोटींची मालमत्ता हस्तगत,कंत्राटदार,बिल्डर,जमीन खरेदी – विक्री करणारे अधिकाऱ्यांच्या निशाण्यावर…!
1 min read

फक्त पाचच सेकंदात आपल्या स्थानिक गावांसह संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात वाचकांच्या मनामनात पोहोचणारे एकमेव चॅनल महाराष्ट्र न्यूज. आपली जाहिरात आणि दर्जेदार,निर्भिड बातम्यांसाठी संपर्क करा ,मुख्य संपादक : भारत पवार ,मो.9158417131.

नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड सत्र सुरू केल्याने काळे गोरे करणाऱ्या मोठ्या माश्यांच्या पोटात गोळा उठू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात सद्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड सत्र सुरू केल्याने 42ठिकाणाहून तब्बल 240 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता हस्तगत केली आहे. यात बरेच मोठे काळे मासे जाळ्यात अलगद हाती लागले असून नाशिक,धुळे,नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,धुळे, नंदुरबार जिल्ह्यात घातलेल्या धाडीत अवघ्या पाच दिवसांत तब्बल 240 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता हस्तगत केली आहे.यात 6 कोटी रुपये रोकड तर 5 कोटी रुपयांची दागिने यांचा समावेश आहे.इतकी अफाट काळी माया -संपत्ती ह्या व्यापाऱ्यांकडे आली कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला असून 175 आयकर अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाड सत्र टाकून लुटमार करणारे बिल्डर,व्यावसायिक,कंत्राटदार यांना हादरा दिला आहे.जप्त केलेले घबाड मोजण्या साठी अधिकाऱ्यांना तब्बल 12 तासांचा कालावधी लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, बिल्डर,सरकारी कंत्राटदार आयकर विभागाच्या निशाण्यावर असल्याचे समजते.