June 27, 2022

लोहणेर :माहिती अधिकार कायद्यास ” घो ” म्हणणाऱ्या बेजबाबदार ,मनमानी कारभार हाकणाऱ्या यु.बी. खैरनार ग्रामविकास अधिकारी यांचे विरुद्ध प्रथमअपील दाखल

1 min read

(यू. बी. खैरनार ग्रामविकास अधिकारी ,लोहनेर ग्रामपंचायत )

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहणेर येथील ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी यू.बी खैरनार यांनी बेजबाबदार आणि मनमानी पणाचा कळस गाठला असून असे बेढंग वागण्या साठी आणि बे कायदेशीर सर्रास पने वागणाऱ्या ह्या ग्रामविकास अधिकाऱ्यास कोणाचा बे कायदेशीर आशीर्वाद आहे ? उच्च पदस्थ अधिकारी यांचे वर कारवाई चा बडगा का उगारू शकत नाही ? असा प्रश्न खैरनार यांच्या राम भरोसे कर्तव्या वरून माहिती अधिकार का.महासंघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष तथा मुख्य संपादक / पत्रकार भारत पवार यांनी प्रसिध्दी माध्यमाद्वारे नाशिक येथील सी ई ओ बनसोडे मॅडम व  देवळा येथील गट विकास अधिकारी देशमुख साहेब यांना केला आहे. खैरनार हे सलग चार वर्षांपासून अधिक कालावधी पासून लोहणेर येथील ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत.अशातच ते कधीच मुख्यालयी न राहता त्यांच्या राहण्याच्या ठिकाणा पासून तर कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतीच्या अंतरापा पासून नक्कीच ८ की.मी.अंतराच्या पुढे वास्तव्यास आहेत हे कायद्याला अनुसरून तर नाहीच परंतु लोहनेर येथील ग्रामपंचायत रेकॉर्ड प्रमाणे आज रोजी सुद्धा पांडुरंग अहीलाजी पवार सद्या त्यांची मुल यांच्या नावे असलेल्या मालकीच्या खाजगी जागेवर जागा मालकांना न विचारता ,न कळविता किंवा एखाद्या उच्च पदस्थ अधिकारी यांचा कुठलाही आदेश नसताना सुद्धा त्या जागेवर सरकारी योजनेतील पेव्हरब्लॉक ( गट्टू ) बसून दिलेत.आणि जागा मालकांना सांगतात की ती जागा सरकारी आहे.जर ती जागा सरकारी असेल तर तुमच्याच ग्रामपंचायत कार्यालयात रेकॉर्डला नमुना नंबर ८ नोंद उतारा दाखवा तर उतारा नाही असे सांगून मोकळे होतात आणि त्या जागेचा नमुना नंबर ८ नोंद उतारा मात्र जागा मालक पांडुरंग पवार आता त्यांची मुल वारस म्हणून हे महाशय त्यांचे सही शिक्या निशी देतात याचे भान त्यांना का नसावे ? तरीही जागा शासनाची कशी ? याचाच अर्थ शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करून ज्या कोणी व्यक्ती ने पेव्हरब्लॉक ( गट्टू ) बसविण्यास लावले असतील त्यांचे कडून काही तरी रक्कम घेऊन बसून दिले आणि जागा मालकास तोंडी सांगतात जागा सरकारी आहे.उगीचच दुसऱ्याच्या घशात ही जागा घालने हा लुटमारी सारखा प्रकार का चालवला असेल ? असे किती प्रकार ह्या महाशयांनी केले असतील ? शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी यांनी बदली न करता चार वर्षांपासून पुढील कालावधी यकाच गावी  खैरनार यांना का ठेवले असेल ? जनतेस आणि शासनाची फसवणूक करण्या साठी च का ? असा संतप्त सवाल पवार यांनी केला असून याबाबत आपणास योग्य न्याय वरिष्ठांनी देऊन हा सर्व फसवणुकीचा प्रकार ह्या खैरनार महाशयांनी शासनास आणि जागा मालकास केला असून याबाबत भारत पवार यांनी सन १९७१ पासून तर २०२१ पर्यंत  माहिती अधिकार कायद्या नुसार माहिती मागितली असता माहिती अधिकार कायद्यास न जुमानता कायद्यास ” घो ” म्हणून बेजबाबदार पने वागून माहिती न देता माहिती अधिकार कार्यकर्त्या स वेठीस धरण्याचा प्रकार केला आहे त्यामुळे खैरनार यांचे विरूध्द गट विकास अधिकारी देवळा यांचे कडे प्रथम अपील दाखल करून दप्तर दिरंगाई कायदा २००६ नुसार तसेच जाणून बुजून माहिती न देणे आणि माहिती मागणाऱ्या स वेठीस धरणे आदी नियमा प्रमाणे त्यांचे वर कारवाई करून माहिती आता मोफत देणेत यावी अशी मागणी पत्रकार तथा माहिती अधिकार का.महासंघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष भारत पवार यांनी केली आहे.याबाबत अपील अधिकारी तथा गट विकास अधिकारी ,देवळा हे खैरनार विरुद्ध काय कारवाई करतात याकडे पवार यांचे लक्ष लागले असून अन्यथा माहिती आयुक्त यांचे कडे दुसरे अपील दाखल तर केले जाईलच परंतु दप्तर दिरंगाई कायदा २००६ अन्वये कारवाई करणे बाबत जिल्हाधिकारी व सी ई ओ ,नाशिक यांचे कडे दाद मागितली जाईल असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.