देवळा नगरपंचायतीचा निवडणूक प्रचार पॉवरफूल, प्रभाग क्रमांक ७ मध्ये कोमजनार कमळाचे फूल ?

0
77

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,भारत पवार मुख्य संपादक , मो.9158417131

देवळा नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीची धून ऐन हिवाळ्यात गरम होऊ लागल्याने देवळा शहरातील वातावरण हिवाळ्यात अधिक गरम होत असलयाने गुलाबी थंडीत मतदार राजा उमेदवार प्रचारांचा आस्वाद घेत आहे.तर घड्याळ की फूल याविषयी चर्चेचा फड रंगू लागला आहे तर काही ठिकाणी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी आपली पावर वापरून दिग्गजांना धक्का दिल्याने ते थेट घड्याळा पर्यंत जाऊन थांबल्याने कमळाचे फूल कोमजण्याच्या बेतात असल्याचे बोलले जात आहे.याबाबत जनतेचा कानोसा घेतला असता उल्हास गुजरे आणि रघू नवर हे  गेल्या अनेक वर्षांपासून हातात कमळाचे फूल घेऊन दिमाखाने कार्य करत होते. दोघेही नगरसेवक पदी निवडून येऊन आपआपल्या समाजाचे नेतृत चांगल्या प्रकारे करत होते. त्यांनी समाज हिताची कामेही चांगल्या प्रकारे केल्याने समाजात त्यांचे चांगले वर्चस्व आहे. रघु नवरे हे आदिवासी समाजाचे नेत्तृत उत्तम रीतीने पार पाडत आहेत तर उल्हास गूजरे चर्मकार समाजाचे नेतृत्व अतिशय उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. त्यामुळे गुजरे आणि नवरे यांना समाजात आणि इतरत्रही मानणारे मोठा परिवार आहे.असे असून सुद्धा भाजपाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी आपली पावर वापरून नगरसेवक नवरे आणि गुजरे यांना धक्का देत दूर सारले.अर्थात त्यांना भाजपाचे तिकीट न देता दुसराच मर्जीतील उमेदवार उभा करून आहेर यांनी माजी नगरसेवकांची नाराजी ओढवून घेतली. गुजरे आणि नवरे यांना अपमान सहन करावा लागल्याने त्यांना धक्का बसला.आणि त्यांचा तो धक्का थेट घड्याळा पर्यंत पोहचल्याने रघु नवरे आणि उल्हास गुजरे यांनी एकी करून घड्याळ मनगटी बांधून प्रभाग क्रमांक ७ मध्ये फुल कोमजणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा कानोसा असून अशी च प्ररचार यंत्रणा सर्वच प्रभागात राबविल्यास भाजपचा प्रचार कितीही असला पॉवरफूल तरीही कोमजणार कमळाचे फूल अशी चर्चा दबक्या आवाजात आहे. बघू या खरे चित्र काय ते येणाऱ्या काही दिवसात कळणारच.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here