September 21, 2023

पुरोगामी पत्रकार संघास मालेगावी स्वतंत्र कार्यालय देण्याचा प्रयत्न करणार _ कृषी मंत्री ना.दादाजी भुसे

1 min read

 

भारत पवार : मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ मो.9158417131

मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ मालेगाव येेेेथील सोयगाव येथे पुरोगााामी पत्रकार संघाचा पाचवा वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला यावेळी

सुरूवातीला थोर महापुरूषांच्या  प्रतिमापूजन नाशिक उपजिल्हाधिकारी महादेव थैल यांच्या हस्ते करण्यात आले. संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब आडागळे यांनी संविधान उद्देशिका चे वाचन केले अध्यक्षस्थानी कृषिमंत्री ना.दादाजी भूसे होते.तर प्रमुख पाहूणे राष्ट्रवादी पक्षाचे अल्पसंख्याक विभाग सेक्रटरी सलाउद्दीन खान व पायमा फाऊंडेशनच्या प्रदेश अध्यक्ष ङाॅक्टर भावना शिरकर होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

पत्रकारांना  सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी पत्रकार संमेलन घेण्यात आले यात लक्षवेधी 12 व्या बाॅङी बिल्ङर स्पर्धेत जागतिक कास्य पदक विजेते सुभाष पुजारी यांना  महाराष्ट्र भूषण पुरस्कार व मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.याच बरोबर समाजातील नामांकित व्यक्तीना मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले.यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पत्रकारांना काय अडचण येतील या सर्व मदत करण्यास मी समर्थ आहे तुमचे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावू तसेच  पुरोगामी पत्रकार संघासाठी मालेगाव येथे स्वतंत्र कार्यालय देण्याचाही प्रयत्न करू अशी  घोषणा कृषिमंत्री दादाजी भूसे यांनी यावेळी केली.

देशभरातून 800 पत्रकार सभासद संघाच्या माध्यमातून कार्यरत आहेत.अनेक सदस्यांनी संघाच्या माध्यमातून औद्योगिक, सामाजिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.प्रेरणा आणि ऊर्जा देणारं व्यासपीठ संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्याआत्मविश्वासावर आज गरूङझेप घेत आहे.हा प्रवास जरी कष्टदायी असला तरी योग्य प्रयत्नांती यश असतेच, असे सांगत  त्यांनी उपस्थितांना  उत्कृष्ट मार्गदर्शन केले.यावेळी संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी पत्रकार विजयकुमार वहाळ यांच्या निवङीची घोषणा करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

बाळासाहेब आडागळे ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमुख सल्लागार सुभाष बिंद वाल ,विनोद पवार ,राष्ट्रीय महासचिव प्रवीण दोशी ,राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत वाळुंज ,राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाश चितळकर ,राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील चौधरी, राज्य संघटक ज्ञानेश्वर बागुल ,महिला उद्योग समितीचे प्रदेशाध्यक्ष अनिल वैद्य ,क्रीडा विश्व समितीचे अध्यक्ष फिरोज खान, महिला अध्यक्ष सुनिता, राज्य सचिव तेजश्री विसपुते ,अमोल सोनार ,श्याम दाभाडे ,तोमर, युवा संघर्ष पुणे चे अध्यक्ष रिषभ तोमर, पत्रकार विजयकुमार वहाळ ,महिला अध्यक्ष मनीषा घुले ,नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष जाधव ,कार्याध्यक्ष रफिक सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष तृप्ती ढवल, शहराध्यक्ष मनिषा पवार, मालेगाव तालुका अध्यक्ष आशिक अली सय्यद, सचिव शेखर सोनवणे ,कार्याध्यक्ष अन्वर पठाण ,सल्लागार प्रदीप देवरे, अरमान पठाण ,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, शहराध्यक्ष भीमराव शिरसाट ,उपाध्यक्ष सुभाष जैन ,तालुका उपाध्यक्ष संदीप सोळुंके ,महिला विभाग पद्मा जाधव, दामिनी बागुल व संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण दोशी यांनी केले,तर आभार प्रदर्शन मालेगाव तालुका सचिव शेखर सोनवणेयांनी केले.तसेच या  कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार,उद्योजक,साहित्यिक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.