क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रवेशद्वाराजवळील ओझरच्या वैभवात घाणीचे साम्राज्य..त्यामुळे फुले यांच्या नावाची होते विटंबना..तरीही प्रशासन का लक्ष देईना ?

0
41

भारत पवार : मुख्य संपादक : 9158417131   ओझर टाऊनशिप : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर(मिग) हे शहर एच ए ए एल कंपनी मुळे जागतिक पातळीवर चांगल्या नावाने ओळखले जाते.रशिया, ऑस्ट्रेलिया, लंडन ,युरोप सारख्या देशातील नागरिक येथील कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून नोकरीस कार्यरत आहेत.तर दिल्ली,ओरिसा, कर्नाटक ,तामिळनाडू ,आंध्र प्रदेश,जपान,बेंगलोर,लखनऊ, हैदराबाद ,महाराष्ट्र यासह अनेक राज्यातील तरुण येथे नोकरी निमित्त व अनेक नागरिक व्यवसाय निमित्ताने कार्यरत आहेत त्यामुळे साहजिकच ओझर मिग गावाचे नाव जागतिक पातळीवर चांगल्या नावाने घेतले जाते.असे असताना ओझर मिग गावातील स्थानिक प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कुचकामी ठरली आहे. गावास मुख्य प्रवेश द्वारास गेट उभारले असून त्या गेटवरील प्रवेश द्वारास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव दिले आहे.त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांची छाती पाच फूट उंचावल्या शिवाय राहत नाही.तर जागतिक पातळीवर ओझरमिग शहराचे नाव घेतले जाते हे येथील नागरिकांचे भाग्यच म्हणायला हरकत नाही.पाच फूट छाती उंचावणाऱ्या आणि येथील सर्व भाग्यवान नागरिकांच्या व प्रशासनाच्या डोळेझाक पणा मुळे म्हणा की बेजबाबदार पणामुळे म्हणा येथील प्रवेशद्वारावर टाकलेल्या क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या नावाची विटंबना केली जात आहे. ती अशी प्रवेशद्वारा जवळ अनेक प्रकारची घाण टाकून  निर्लज्ज पणाचा कळस गाठणाऱ्या नागरिकांवर स्थानिक प्रशासन ग्रामपालिका ? नगरपंचायत आणि येथील पोलीस प्रशासन यांनी दंडात्मक कारवाई करून घाण टाकणाऱ्या व्यक्तीस आळा घालावा अशी मागणी महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक तथा अखिल भारतीय भ्रष्टचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माहिती अधिकार का. महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत पवार यांनी पोलिस प्रशासन आणि ग्रामपालिका? नगरपंचायतीच्या कारभाऱ्याकडे वेबपोर्टल चॅनल द्वारे केली आहे. याबाबत पवार यांनी संताप व्यक्त केला असून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात म.फुले यांची पुण्यतिथी काल रविवार (दि.२८) रोजी स्वच्छ वातावरणात साजरी केली गेली.परंतु ओझर मिग येथील गावात मात्र गालबोट लागल्याने ह्या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो असेही भारत पवार यांनी म्हटले आहे. तेव्हाच्या येथील ग्रामपालिकेने शहराच्या मुख्य वेशीवर  प्रवेशद्वार बसून त्यावर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रवेश द्वार ओझर (मिग) आपले सहर्ष स्वागत करीत आहे. असे टाकले आहे.परंतु प्रवेश द्वारा लगतच अनेक विध प्रकारची घाण टाकली जाते आहे.हे अनेक कालावधी पासून चालत आलेले आहे.जणू काही येथील परंपराच घाण टाकणाऱ्या व्यक्तींनी टिकून ठेवली आणि त्याची जोपासना ग्रामपालिका ? की नगरपंचायत करते की काय ?असे म्हणणे वावगे ठरणार नाही.त्यामुळे इच्छा नसतानाही प्रवेशद्वारास अर्थात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावास म्हणा किंवा क्रांतीसुर्य म.फुले यांना म्हणा टाकलेल्या  घाणीत लक्ष ठेऊन तेथील दुर्गंधी सहन करून गावात येणाऱ्या अनेकांचे घाण आणि दुर्गंधीयुक्त सहवासाने स्वागत करावे लागते. हे वाईट असून स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिकारी यांनी डोळेझाक केल्याने घाण टाकणाऱ्यांचे फावले आहे.ज्या महान समाज सुधारकांनी छत्रपती शिवरायांची पेशवाई ने धुळीत घातलेली समाधी शोधून रायगडावर जाऊन पहिली शिव जयंती सुरू करणारे ,पहिला महिला शिक्षणाचा पाय रोऊन महिला उद्धारक आणि ३०० ओळींचा पहिला पोवाडा लिहिणारे पहिले शाहीर महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव प्रवेशद्वाराला देऊन क्रांती करणारे येथील प्रशासन आणि नागरी सध्या घाणी कडे साफ दुर्लक्ष करून नावाची विटंबना होते सर्वत्र दुर्गंधी पसरते तरीही कानावर हात ठेवल्याने हे लांच्छनास्पद आणि वाईट लक्षण आहे त्यामुळे जागृत नागरिकांनी वेळीच सावध होऊन येथील घाण कायम साठी नगरपंचायत… ग्रामपालिका यास उचलण्यास भाग पाडले आणि कायम स्वच्छता ठेवली तर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना खरी आदरांजली ठरवून पवित्र स्मृतीच्या ठिकाणी कायम पवित्रता अर्थात स्वच्छता कायमस्वरूपी राहील अशी समस्त नगरिकांनी काळजी घेऊन क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना खरी आदरांजली ठरणार. हा परिसर कायम स्वच्छ ठेवण्यास येथील ग्रामपालिका ? नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी व पोलिस अधिकाऱ्यांनी जागृत राहून यापुढे जो कोणी व्यक्ती घाण टाकणार त्यावर दंडात्मक कारवाई करून परिसर कायम स्वच्छ ठेऊन म.फुलेंची नावाची केली जाणारी विटंबना कायमची थांबवून ओझर मिग गावाचे नाव आहे ते उज्वल ठेवावेअशी मागणी भारत पवार यांनी केली असून उशिरा का होईना येथील नागरिकांना, ग्रामपालिकेस ? नगरपंचायतीस उशिरा का होईना  शहाणपण येईल आणि घाणीचे साम्राज्य हटवून कायम साठी स्वच्छता ठेवतील अशी अपेक्षा महाराष्ट्र न्युजचे मुख्य संपादक भारत पवार यांनी व्यक्त केली असून येथील प्रवेशद्वारापासून रस्त्याचे चिंधडे _ चिंधडे झाले असून रस्ता खड्यात की खड्ड्यात रस्ता अशी जीर्ण अवस्था झाली रस्त्याची झाली आहे. रस्त्याकडेही ग्रामस्थांनी लक्ष देऊन ग्राम पालिकेस ? नगरपंचायतीस रस्ता दुरुस्ती करण्यास लक्ष पुरवावे असेही पवार यांनी म्हटले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here