“जय भीम “व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी चित्रपट

0
44

 

 

पुणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , स्पेशल _             संविधानाला मुळे आपण आहोत याची जाणीव जय भिम या चित्रपटामुळे होते.जयभिय म्हणजे न्याय जयभिम म्हणजे माणुसकी अन्याया विरोधात असणारा प्रत्येक भारतीय जयभिम असतो.जयभिम चित्रपटात कुठेही जयभिम चा उल्लेख नाही की डॉ बाबासाहेब यांच्या नावाचा पण उल्लेख नाही तरीही याचित्रपटाला नाव जयभिम आहे. चित्रपटाचे नाव बघुन उत्सुकतेपोटी मी हा चित्रपट बघितला..

या चित्रपटात संपूर्ण संविधान एकवटले आहे. या चित्रपटात कुठेही अतिरेक दाखवला नाही.एक सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे प्रस्थापितां च्या वर्चस्व त्याला पोलिसांचे समर्थन. स्वतःच्या पदोन्नती साठी वाटेल त्या स्तराला जाऊन गरीब साध्या भोळ्या आदिवासींचे शोषण करतात. केसेस पूर्ण करण्यासाठी आदिवासींना चोरीच्या,हत्येच्या केसेस लावल्या जातात.कारण या आदिवासी जातींना गुन्हेगारी जाती मानल्या जातात.अशाच अनेक जाती आहेत ज्यांना गुन्हेगारी जाती मानल्या जाय च्या आणि आजही मानल्या जातात. गावात कोणताही गुन्हा घडला की त्यांना पोलीस आधी पकडतात त्यांनी अपराध करो वा नको.त्यांना असे मारल्या जाते की ते सहन करण्याच्या पलीकडे जाते अशा वेळी गुन्हा न करताही हे निरपराधी अपराध मान्य करतात. जय भिम हा असा चित्रपट आहे जिथे आदिवासींना मतदान कार्ड सुद्धा नाही. या लोकशाही प्रधान देशात जिथे प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे त्याला तो अधिकार दिला जात नाही.त्यांना देशाचे नागरिकत्व आहे हे नाकारल्या जाते, ते माणूस आहेत हे नाकारल्या जाते. जातीयवाद, श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना वाढीस येते.यातून शोषणाची सुरुवात होते.अशा प्रसंगी न्याय हा भारतीय कायदाच देऊ शकते जेव्हा हे कायदे चालवणारे प्रामाणिक असतील तरचनाही तर याच कायद्याचा वापर गैरकायदेशीर कामात केला जाऊ शकतो.आजही आपल्या देशात अनेक अत्याचार होत आहेत,देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज अशा घटना घडत आहेत अट्राॕसिटी कायदा असतांना प्रामाणिक चालक अथवा प्रस्थापितांच्या वर्चस्वामुळे गुन्हेगारांना  सजा मिळत नाही याची खंत वाटते शेवटी पोलीस आणि वकील दोन्ही प्रामाणिक असतील तर देशात कायद्याचे राज्य स्थापन होऊ शकते मग सरकार कोणाचेही असो. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने चित्रपटाचे नाव जयभिम ठेऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटाचा सत्कार आहे असे वाटते. या देशाला डॉ बाबासाहेबांनी भारतीय संविधान दिले, मानवतावादी बौद्ध धम्म दिला.भारतीय राज्य घटना आणि कायदा प्रामाणिक पणे अंमलात आणले तर या देशात कोणीही शोषित राहणार नाही हेच या चित्रपटाच्या निमित्ताने निदर्शनास आले.संविधानात सार्वभौम समाज वादी धर्मनिरपेक्ष,लोकतंत्रात्मक गणराज्य ही तत्वे का आहेत आणि ती अमलात कशी येऊ शकतात याची प्रचिती या शेवटी निदर्शनास येते आणि सन्मानाने जयभिम म्हणावे  वाटते..

 

विषमतेच्या लढ्यात दबलेल्या आणि पिचलेल्या लोकांचं वज्रास्त्र म्हणजेच जय भिम होय जातिव्यवस्थेने भरडलेलें दीन-दलित आदिवासी जनतेला न्याय,हक्क आणि अधिकाराच्या लढ्यात बाबासाहेबांनी हाती दिलेले शस्त्र म्हणजे सविंधान

आजही आपल्या देशात जातीने चुरडलेलें लोक आहेत अन् त्यांना आजही जनावरांपेक्षा ही बत्तर वागणूक दिली जाते खरंच बाबासाहेब आंबेडकरांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.ते होते म्हणून इथल्या गरिब लोकांना न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य आधुनिक भारताच्या जडणघणीसाठी व बहिष्कृत समाजातील प्रत्येक घटकातील लोकांसाठी त्यांना त्यांचे हक्क अधिकार न्याय मिळविण्यासाठी अर्पण केले. तसेच डॉ.बाबासाहेब यांनी आपले संपुर्ण जीवन संघर्ष मय पणे जगले.त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत कष्ट,परिश्रम व त्यांनी केलेला त्याग हा आम्ही वैचारिक विचार परिवर्तनवादी वाया जावू देणार नाहीत आंबेडकरांचे जीवन चरित्रत्यांचे कार्य व त्यांचे विचार याचा परिपूर्ण असा सखोल अभ्यास करून,त्यांचे विचार आत्मसात करून,त्यांचे अनु करण करू,त्यांनी शिकविलेल्या मार्गावर चालू. डॉ आंबेडकरांना डोक्यावर न घेता त्यांना डोक्यात घेऊ व डॉ आंबेडकरांना अभिप्रेत असलेला प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी सातत्याने मोलाचे योगदान देऊ.आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे सातत्याने कार्य करू व योगदान देऊ.संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे..सर्वांच्या समान सन्मानाची मूल्य व्यवस्था आणि शासन कसे असावे,या प्रश्‍नाचे उत्तर संविधानाच्या पाना पानावर उभे आहे.सर्वस्पर्शी न्यायावर आधारलेल्या सुसंस्कृत राष्ट्राचे चित्र संविधानात आहे. संविधान म्हणजे भारताचा ऐक्‍यसिद्धान्त आहे.पण येथील मनुवादी व्यवस्थेला आणि  इथल्या  शासन व्यवस्थेला ते होऊ द्यायचे नाही कारण सत्ता ही त्यांची जहागीर आहे आणि त्याच्याकडेच ती असली पाहिजे त्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत..

 

जय भीम यामध्ये दाखविलेला राजकन्नु हा आदिवासी तरुण गावा तील जमीनदाराच्या घरातील साप पकडण्यासाठी निघतो,जमीनदाराचा  प्रतिनिधी त्याला फटफटीवर बसवतो पण बसतांना राजकन्नूचा हात फटफटी वाल्याच्या खांद्यावर अगदी नकळत पडतो.फटफटीवाला राजकन्नूकडे रागानं बघतो.ह्या एका छोट्याश्या दृश्यातून ह्या भारत भूमीतलं भीषण वास्तव अधोरेखीत होतं.पण चित्रपट तेवढं मांडून थांबत नाही.पुढं थेट जीवघेणा अत्याचार,अत्याचाराच्या विरुद्धचा संविधानिक चौकटीतील संघर्ष होय..आणि पुढं सरकत राजकन्नू च्या छोट्याशा मुलीचं खुर्चीवर अत्यंत आत्मविश्वासानं पुस्तकं वाचत बसणं. दक्षीण भारतीय चित्रपट सृष्टीने समाजातील जें वास्तव जातीभेद अस्पृश्यता आदिवासींचं जगणं इत्यादी आहे.जात वास्तव जातीभेदअस्पृश्यता अन्याय अत्याचार हें जसं ह्या भारत भूमीतलं भीषण वास्तव आहें,त्याच बरोबर ह्या सर्व विषमता,अन्याय अत्याचारग्रस्तांनी हें निमूटपणे सहन केलं नसून त्याचा सतत प्रतिकार केला आहे, त्याविरोधात त्या त्या काळात शक्य असलेल्या मार्गानी प्रतिरोध उभा केला आहें.तुकोबाराय सारख्या संतांच्या पासून तर बिरसा मुंडा,फुले, गाडगेबाबा,शिवराय,शाहू,पेरियार आंबेडकर ह्यांच्या पर्यंत आणि पुढंही सत्यशोध,मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड,स्त्रीवादी चळवळींनी प्रतिरोध नी पर्यायाची मशाल सतत धगधगत ठेवली आहे नागरिकांच्या मूलभूत हक्काचे हनन झाले असता सरकारकडे दाद मागण्या चा अधिकार राज्यघटनेतील कलम ३२ अंतर्गत मूलभूत अधिकार या भागात येतो.पिडित व्यक्तीला न्याय मिळावा यासाठी हेबियस कॉर्पस'(बंदी प्रत्यक्षीकरण) अंतर्गत न्यायालयात दाद मिळू शकतो. सत्य आणि असत्या च्या लढाईत सत्याने लढाई लढून आपण कसे जिंकू शकतो तेच या चित्रपटात दाखविले आहे सुरुवातच आदिवासी समाजाला आपल्या दैनंदिन गरजाभागवण्यासाठी कुठल्या मार्गाचा वापर करावा लागतो इथून होते.शोषक आणि शोषितांची वस्ती सर्वत्र असते त्याला हा चित्रपट ही अपवाद नाही…

मानवाधिकार आयोगाकडे शिक्षिकेच्या मदतीने तक्रार नोंदविण्यात येते.के.चंद्रू नावाचे इमानदार वकील ‘हेबियस कार्पस’ या याचिकेद्वारे ही केस कोर्टामध्ये लढतात राजाकन्नू ची पत्नी सिंगिनी हिला केस वापस घेण्यासाठी पैशाचे आमिष दिल्या जाते तेव्हा स्वच्छ मनाची सिंगिणी म्हणते,*”मेरे बच्चे बडे होने के बाद मुझे पुछेंगे की पिता मरने के बाद तुम्हारे पास इतने पैसे कहासे आये तो मै क्या जवाब दू”.?* मै अपना स्वाभिमान नही बेच सकती हू साहब या शब्दात ती बोलते.शेवटी निर्णय आदिवासी सिंगिणीच्या बाजूने लागतो.अपराधी पुलिसांना शिक्षा होते.एका विशिष्ट जातीला चोर समजण्याचा प्रघात या देशात आहे तेव्हा अधिवक्ता के.चंद्रू याचे वाक्य… क्या तेरे जाती मे, मेरी जाती में बडे बडे चोर नही होते है?हे वाक्य खूप काही सांगून जाते. (आपल्या देशातील चोरटे कौन? हे वेगळे सांगायची गरज नाही).

 

एका निराधार महिलेला न्याय मिळावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे वकील के. चंद्रू यांच्या असीम साहसाचे दर्शन या चित्रपटात होते आपण बघतोय आपल्या देशात कायद्याला आपल्या बाजूने झुकविणाऱ्यांची जमात आहे.चोर सोडून अनेकदा संन्याशाला फाशी दिल्या जाते.पण इमानदार पुलिस आॅफिसर,आणि इमानदार वकिलां मार्फत या देशातील कानून व्यवस्था सुचारूपणे राहू शकते.गरीब लोकांना न्याय मिळू शकतो कारण ही राज्य घटना लिहिण्यामागचा विश्वरत्न बाबासाहेबांचा मूळ उद्देश या देशातील शेवटच्या मानसाला न्याय मिळवून देणे हाच होता..

जय भिम… जय भारत .🙏🏻🖊️📚

भारत पवार : मुख्य संपादक , क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ मो.9158417131

*लेखक _ ✍️शिवश्री संतोष शकूंतला आत्माराम*

*बादाडे पाटील – 9689446003*

*जिल्हाध्यक्ष पुणे..9005546004*

*जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,

महाराष्ट्र राज्य..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here